अमेरिका-चीनमधल्या 'ट्रेड वॉर'नं धारण केलं भयानक रुप

अमेरिका - चीनच्या या ट्रेड वॉरमध्ये जागतिक अर्थव्यवस्था चिंतातूर अवस्थेत आहे

Updated: Aug 24, 2019, 11:30 AM IST
अमेरिका-चीनमधल्या 'ट्रेड वॉर'नं धारण केलं भयानक रुप title=

नवी दिल्ली : अमेरिका आणि चीन दरम्यान सुरु असलेल्या 'ट्रेड वॉर' काही थांबताना दिसत नाही. उलट या 'ट्रेड वॉर'नं आणखीनच गंभीर रुप धारण केलंय. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनविरुद्ध टेरिफमध्ये आता पुन्हा एकदा वाढ करण्यात आलीय. येत्या १ ऑक्टोबरपासून हे वाढलेले दर लागू होणार आहेत. अमेरिका - चीनच्या या ट्रेड वॉरमध्ये जागतिक अर्थव्यवस्था चिंतातूर अवस्थेत आहे.

१ ऑक्टोबरपासून २५० बिलियन डॉलर चायनीज मालावर अमेरिका २५ टक्क्यांऐवजी आता ३० टक्के टेरिफ वसूल करणार आहे. तर १ सप्टेंबर पासून ३०० बिलियन डॉलरच्या चायनीज मालावर अमेरिकेनं १० टक्के टेरिफऐवजी १५ टक्के टेरिफ वसूल करण्याचा निर्णय जाहीर केलाय. 

ट्रम्प यांच्या या घोषणेपूर्वी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अमेरिकेहून आयात होणाऱ्या ७५ बिलियन डॉलरच्या प्रोडक्टवर जास्त टेरिफ लावणार असल्याचं म्हटलं होतं. अमेरिकेतून आयात होणाऱ्या जवळपास ५००० वस्तूंवर चीनचा ५-१० टक्के टेरिफ वाढवण्याचा विचार आहे. यामध्ये अमेरिकेतून निर्यात केल्या जाणाऱ्या कृषी उत्पादनं, विमानं आणि क्रूड ऑईलचा समावेश आहे. याशिवाय अमेरिकेतून चीनमध्ये येणाऱ्या या प्रकारच्या वस्तूंवर दुसऱ्यांदा २५ टक्के टेरिफ वसूल करण्यात येणार आहे. हे निर्णय १ सप्टेंबर आणि १५ डिसेंबर अशा दोन भागांत लागू करण्यात येतील.