अमेरिकेची चीनवर सगळ्यात मोठी कारवाई

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सर्वात मोठी कारवाई केली आहे.

Updated: Jun 3, 2020, 10:20 PM IST
अमेरिकेची चीनवर सगळ्यात मोठी कारवाई title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : अमेरिका आणि चीनमधील तणाव काही केल्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सर्वात मोठी कारवाई केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 16 जूनपासून अमेरिकेमध्ये चीनी उड्डाणांवर बंदी घातली आहे.

कोरोना संकटादरम्यान अमेरिका आणि चीनमधील खालावलेले, बिघडलेले संबंध ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर, आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ट्रम्प सरकारने बुधवारी चीनी विमान कंपन्यांना अमेरिकेत उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि प्रवासासंबंधी तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकन वाहकांना चीनमध्ये पुन्हा सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात बीजिंग अपयशी ठरला. त्यानंतर ट्रम्प यांनी चीनवर कारवाई करत चीनी एअरलाईन्सची सर्व उड्डाणं रद्द करण्याचे आदेश दिले. 

निसर्ग चक्रीवादळाचा मान्सूनच्या आगमनावर परिणाम होणार?

अमेरिकन परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चीनी एअरलाईन्सवरील बंदीचे आदेश 16 जूनपासून लागू होतील. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी 16 जूनआधीच बंदी करण्याचे आदेश दिल्यास लवकरच याची अंमलबजावणी होऊ शकत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

मोदींचा करिश्मा कायम, हे आहेत भारतातले सगळ्यात 'लोकप्रिय' मुख्यमंत्री

दरम्यान, वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेत पुन्हा एकदा हिंसा भडकण्यास सुरुवात झाली आहे. कृष्णवर्णीय अमेरिकन जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसक वातावरण सुरू आहे. अतिशय संवेदनशील अशा मुद्द्यावरुन उडालेल्या भडक्याने जवळपास ३० हून अधिक शहरांमध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनांनी हिंसक वळण घेतलं आहे. अमेरिकेतील विरोध प्रदर्शन पाहता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी बंडखोरी कायदा लागू करण्याची धमकी दिली आहे. हा एक जुना कायदा आहे, जो देशातील घरगुती हिंसाचार संपविण्यासाठी अमेरिकन सैन्य पाठवण्यास राष्ट्राध्यक्षांना अधिकार देतो.

 

'जॉर्ज फ्लॉईडसह त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यास आम्ही वचनबद्ध'