धक्कादायक! अमेरिकेत २४ तासांत १८१३ लोकांनी कोरोनामुळे गमावले प्राण

अमेरिकेत वाढतोय मृतांचा आकडा 

Updated: May 14, 2020, 02:45 PM IST
धक्कादायक! अमेरिकेत २४ तासांत १८१३ लोकांनी कोरोनामुळे गमावले प्राण  title=

मुंबई : अमेरिकेत कोरोना व्हायरचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत १८१३ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत कोरानेमुळे ८४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात अमेरिकेत सर्वाधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत १४ लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

अमेरिकेत कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अस असतानाही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प देश लॉकडाऊनमधून सुरू करण्याचा विचार करत आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी राज्यातील सर्व गर्व्हनरांशी चर्चा केली आणि शाळा सुरू करण्याची तयारी करण्याचे आदेश दिले. 

अमेरिकेचे एक्सपर्ट डॉ. एंथोनी फॉकी यांनी सांगितलं की, अमेरिकेने लॉकडाऊनमधून देश सुरू करण्याची एवढी घाई करू नये. नाहीतर कोरोनाचा कहर आणखी वाढू शकतो. मात्र याकडे ट्रम्प यांनी दुर्लक्ष केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपतींनी दावा केला आहे की, आमचा देश आता महासंकटातून बाहेर येत आहे. जर शाळा सुरू झाल्या नाहीत तर देश सुरू झालाय असं वाटणारच नाही.   

अमेरिका सरकारने कोरोना व्हायरसवरील वॅक्सीन शोधण्यास वैश्विक युतीचा हिस्सा न होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अमेरिका स्वतः वॅक्सीन शोधत आहे. theguardian.com च्या रिपोर्टनुसार, ट्रम्प सरकारने 'अमेरिका फस्ट' असा दावा केला आहे. यामुळे विश्वात कोरोनाशी लढण्यासाठी वॅक्सिन तयार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. 

ब्रिटन, चीन, कनाडा, तुर्की, सऊदी अरब, जपानसह  अनेक देशांनी जागतिक आरोग्य संघटना, गेट्स फाऊंडेशन आणि युरोपिअन कमिशनसोबत एकत्र येऊन वॅक्सीनवर काम करण्यासाठी वर्चुअल ग्लोबल समिटचं आयोजन केलं होतं. मात्र अमेरिकेकडून कुणीही यामध्ये सहभागी झालं नाही. या समेट दरम्यान वॅक्सीनकरता ८ बिलियन डॉलर फंड जमा करण्यात आला.