अमेरिकेत यहुदी प्रार्थनास्थळाबाहेर अंदाधुंद गोळीबार

अमेरिकेच्या पीटर्सबर्गमध्ये एका प्रार्थनास्थळाबाहेर झालेल्या गोळीबारात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात अकरा जणांचा मृत्यू झालाय तर सहा जण जखमी झाले आहेत.

Updated: Oct 28, 2018, 10:54 AM IST
अमेरिकेत यहुदी प्रार्थनास्थळाबाहेर अंदाधुंद गोळीबार title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या पीटर्सबर्गमध्ये एका प्रार्थनास्थळाबाहेर झालेल्या गोळीबारात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात अकरा जणांचा मृत्यू झालाय तर सहा जण जखमी झाले आहेत.

एका यहुदी प्रार्थनास्थळाबाहेर हा हादरवून टाकणारा प्रकार घडला. हल्लेखोराने तीन पोलिसांवरही गोळीबार केल्याची माहिती मिळते आहे. अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

देश अमेरिकेसोबत असल्याचे नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे. या गोळीबारानंतर पीटर्सबर्ग सुरक्षा विभागाने ट्विट करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.