close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हिडिओ : आकाशात उडणाऱ्या पक्षावर अजगराची झडप

हा व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय आणि शेअरही केलाय

Updated: Feb 25, 2019, 03:01 PM IST
व्हिडिओ : आकाशात उडणाऱ्या पक्षावर अजगराची झडप

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तेजीनं व्हायरल होताना दिसतोय. एक विशालकाय अजगर या व्हिडिओत दिसत असून त्यानं एका पक्षाला आपल्या विळख्यात घेतल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ कॅथी गाल नावाच्या एका महिलेनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे पांढरे फटक पडलेत. 

कॅथीच्या घराजवळ एक ऍन्टिना लावलेला आहे. त्यालाच हा अजगर लोंबकळलेला आहे. त्यानं आपल्या जबड्यात एका पक्षाला पकडलंय. कॅथीच्या म्हणण्यानुसार, २० फेब्रुवारी रोज ती आपल्या गच्चीत कॅमेरा घेऊन उभी असताना तिला अचानक हे दृश्यं समोर दिसलं. 

हे दृश्यं पाहताना पहिल्यांदा कॅथीच्या तोंडचं पाणीच पळालं... पण स्वत:ला सावरत तिनं हिंमत करून या घटनेचा एक व्हिडिओ शूट केला... हाच व्हिडिओ कॅथीन आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून 'किंग्सक्लिफ हॅपनिंग्स' नावाच्या एका फेसबुक ग्रुपमध्ये शेअर केलाय. त्यानंतर फारच थोड्या वेळात हा व्हिडिओ व्हायरल झाला. 

हा व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय आणि शेअरही केलाय.