Viral Video : आजकाल थीम पार्टीचा जमाना आहे. लोकं पार्टीसाठी वेगवेगळे थीम शोधतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक स्विमिंग पूल पार्टीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. कारण या स्विमिंग पूल पार्टीचं काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या पार्टीत लोक स्विमिंग पूलमध्ये मजा-मस्ती करत होती आणि खाणेपिणे जोरदार सुरु होतं. पण अचानक झालेल्या दुर्घटनेत स्विमिंग पूलमध्ये एकच ओरडाओरडी सुरु झाला. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
ही घटना गुरुवारी इजराइलमधील Karmi Yosef शहरातील आहे. या शहरात एक पूल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होते. या पार्टीसाठी भरपूर सारे गेस्ट सहभागी झाले होते. गेस्ट स्विमिंग पूलमध्ये नाचगात पार्टीचा आनंद घेत होती. तेव्हाच पूलच्या खाली असलेले सिंकहोल उघडलं आणि क्षणात या सिंकहोलने पाण्यासोबत अनेक वस्तू गिळल्या. या दुर्घटनेत अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत. मात्र 43 फूट खोल अशा सिंकहोलने आपलं तोंड उघडताच एका व्यक्तीला त्याने आपल्यामध्ये सामावून घेतलं. Kimhi असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
स्थानिक आउटलेट्स मीडियाच्या रिपोर्टनुसार या घटनेच्या वेळी स्विमिंग पूलमध्ये 6 जण उपस्थित होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत.
अचानक सिंकहोल उघडताच पाण्यासह काही लोकांना त्याने आपल्याकडे खेचलं असं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. काही क्षणात सिंकहोलमध्ये वेगाने पाणी शिरतं आणि काही वेळात अख्खा पूल रिकामा होतो. तुम्ही या व्हिडीओमध्ये बघू शकतात दुर्घटनेच्या वेळी एकच अफरातफरी झाली. लोक घाईघाईने आपले प्राण वाचविण्यासाठी धावू लागली. हे असं अचानक कसं घडलं याचा लोकांना अंदाज देखील येत नव्हता. आनंदाचा क्षण काही वेळात दु:खात बदलला.
“One man has been injured and another is missing after a sinkhole opened up in a inground pool at a home in central Israel.
The incident occurred during a pool party." pic.twitter.com/S9cByAFebx
— natureismetal (@NIMactual) July 21, 2022
Jerusalem Postनुसार या घटनेनंतर दुर्घटनेच्या ठिकाणी रेस्क्यू टीमला बोलवण्यात आलं. या रेस्क्यू दरम्यान सिंकहोलमधून Kimhi व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर या दुर्घटनेसाठी पूल पार्टी ऑर्गनाइज करणाऱ्या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.