या जोडप्यानं पाण्याच्या आत केला विवाह!

आपल्या आयुष्यातला लग्नाचा खास क्षण आणखी खास बनवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात.. फ्लोरिडाच्या एका जोडप्याचीही हीच इच्छा होती... आणि ती त्यांनी पूर्णही केली. 

Updated: Dec 23, 2017, 07:04 PM IST
या जोडप्यानं पाण्याच्या आत केला विवाह!

लंडन : आपल्या आयुष्यातला लग्नाचा खास क्षण आणखी खास बनवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात.. फ्लोरिडाच्या एका जोडप्याचीही हीच इच्छा होती... आणि ती त्यांनी पूर्णही केली. 

या जोडप्यानं पाण्याच्या आत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला... आणि तो अंमलातही आणला... ब्रिटिश आर्मीचा सार्जंट आणि एक माजी डायव्हिंग इन्स्ट्रक्टरनं फ्लोरिडाच्या नॅशनल मरीन सॅन्क्चुरीमध्ये पाण्याखाली लग्न सोहळा पार पाडला. 

इंग्लंडमध्ये राहणारा थॉमस मॉल्ड २०१३ मध्ये एका आर्मी अॅडव्हेंचर ट्रेनिंग डाइव्ह ट्रिप दरम्यान या इन्स्टीट्युटमध्ये आला होता. इथं त्याची ओळख सॅन्ड्रासोबत झाली. सॅन्ड्रा या इन्स्टीट्युटमध्ये डायव्हिंग इन्स्ट्रक्टरमधून काम पाहत होती. दोघांची ओळख प्रेमात झाली आणि त्यानंतर या जोडप्यानं अनोख्या पद्धतीनं एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या.