VIDEO:...म्हणून रुग्णालयाबाहेर श्वानानं 6 दिवस मालकाची वाट पाहिली

श्वान हा सर्वात खरा आणि सच्चा मित्र समजला जातो.

Updated: Jan 23, 2021, 05:49 PM IST
VIDEO:...म्हणून रुग्णालयाबाहेर श्वानानं 6 दिवस मालकाची वाट पाहिली

इस्तंबूल: श्वान हा सर्वात खरा आणि सच्चा मित्र समजला जातो. अनेकदा श्वान आपल्या मालकाची वाट पाहात असल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचे पाहिले असतील. एक क्षण आपल्याला विश्वास बसणार नाही; पण एका श्वानानं चक्क 6 दिवस मालकाची रात्रंदिवस वाट पाहिली आहे. तेही घरात राहून नाही तर रुग्णालयाबाहेर फेऱ्या घालत. ऐकून आश्चर्य वाटेल पण असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा श्वान रुगणालयाबाहेर का फेऱ्या मारत आहे. त्याच्या या व्हिडीओमागची काहाणी ऐकून डोळ्यात पाणी येईल. या श्वानाचा मालक रुग्णालयात दाखल होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याला भेटण्यासाठी त्याची वाट पाहात हा श्वान रुग्णालयाबाहेर थांबला होता. अशा परिस्थितीत तो हॉस्पिटलच्या बाहेर फक्त मालकाला भेटण्यासाठी 6 दिवस थांबला. या श्वानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुर्कीमधील ट्रॅबझोनमधील 68 वर्षीय व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. या व्यक्तीला 14 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या व्यक्तीकडे असलेल्या श्वानाला याची माहिती मिळताच तो देखील रुग्णालयाबाहेर जाऊन थांबला. मालकाला भेटता येईल या आशेनं फेऱ्या मारू लागला.  रुग्णालयातील कर्मचारीदेखील हा संपूर्ण प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले होते.

या श्वानाला घरातील सदस्यांनी अनेकवेळा घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वान आपल्या निश्चयापासून हटला नाही. मालकाला रुग्णालयातून डिस्चार्च मिळाल्यानंतर तो भेटला आणि दोघं घरी एकत्र गेले. हा संपूर्ण प्रकार पाहून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे डोळे देखील पाणावले होते. या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.