मुंबई : तुम्हाला तर माहित आहे सैन्यात भरती होणे सहजासहजी शक्य नसतं, त्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. त्यात ‘मुश्किल वक्त, कमांडो सख्त’ ही ओळ ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक अशी व्यक्ती उभी रहाते की, ज्याच्यावर ऊन, वारा पाऊस यापैकी कशाचाही परिणाम होत नाही. हा कमांडो कोणताही धोकादायक मिशन पूर्ण करू शकतो. त्याला त्याच्या आयुष्याची भिती वाटत नाही. अमेरिकेची मरीन कमांडो ही जगातील सर्वात भयानक कमांडो फोर्स आहे. यूएस मरीन कमांडो ही ती शक्ती आहे जी दुसर्या महायुद्धानंतर सक्रिय आहे. या कमांडो फोर्सबद्दल असे म्हणतात की, त्याचे नाव येताच शत्रू भीतीने थरथर कापू लागतो.
कमांडो हा शब्द लॅटिन शब्द कमांडरपासून आला आहे. कमांडो एक योद्धा किंवा सैन्याचा योद्धा असतो जो युद्धातील कठीण तंत्रांसह मिशनवर विशेष ऑपरेशन्स हातात घेतो आणि ते पूर्ण देखील करतो.
वास्तवात कमांडो हे एक असे युनिट आहे जे सर्व प्रकारच्या ऑपरेशन्ससाठी केव्हाही तयार असतात. यूएस मरीन कमांडो किंवा United States Marine Corps (USMC), हे युनिट अमेरिकन सैन्यांची एक ब्राँच आहे. यूएस नेव्हीच्या मदतीने मरीन कमांडो समुद्रावर आपली शक्ती दाखवतात.
मरीन कमांडो आणि नेव्ही सील कमांडो पूर्णपणे भिन्न आहेत. अल कायदाचा नेता ओसामा बिन लादेनला ठार मारणारा नेव्ही सील कमांडो हा फक्त अमेरिकेच्या नौदलाचा भाग आहे.
मरीन कोरच्या कमांडोना जंगलात टिकून राहण्यासाठी एक टेकनिक शिकवली जाते. यामध्ये सर्वावईव्ह म्हणजे जिवंत रहाण्याच्या टेकनिकवर सर्वाधिक भर देण्यात येते. या टेकनिकमध्ये त्यांना कोब्राचे रक्त प्यावे लागते, जिवंत कोंबडी मारुन खावी लागते, सरड्यांना मारुन त्यांना खावे लागेल आणि जंगलात राहणाऱ्या इतर सजीव प्राण्यांचा देखील त्यांना जीव घ्यावा लागतो आणि जिवंत रहाण्यासाठी त्यांना खावे देखील लागते. कोब्राचे रक्त पिण्यावर पेटाच्या वतीनेही आक्षेप नोंदवला गेला होता.
पेटा ही एक संस्था आहे जी प्राण्यांच्या संरक्षणासाठी कार्य करते. दरवर्षी युद्धाच्या एक्सरसाइजदरम्यान प्रत्येक कमांडोला कोब्राचे रक्त पिऊन आपले श्रेष्ठत्व सिद्ध करावे लागते. या एक्सरसाइजला ‘कोब्रा गोल्ड’ असे नाव देण्यात आले आहे.
प्रशिक्षणादरम्यान कमांडोंना कोब्रा जंगलातून पकडावा लागतो आणि त्याचे रक्त कमांडोच्या तोंडात सांडले जाते. या व्यतिरिक्त कमांडो विषारी विंचू खातात आणि जर ते त्यांना शक्य झाले नाही तर त्यांना या सेवेतून कायमे काढले जाते.
मरीन कमांडोजचे प्रशिक्षण घेणे फार कठीण आहे. हे प्रशिक्षण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक असते. कोणत्याही सैन्य सेवेच्या प्रशिक्षणाच्या तुलनेत या कमांडोचे प्रशिक्षण घेणे फार अवघड मानले जाते.
13 आठवड्यांचे प्रशिक्षण हे सर्वात लांब प्रशिक्षण असते. तर लष्कराचे प्रशिक्षण केवळ 10 आठवड्यांसाठी आणि नेव्हीचे प्रशिक्षण केवळ 9 आठवड्यांसाठी असते. कमांडोच्या प्रशिक्षणात पुरुष आणि महिला दोघेही समानप्रकारे भाग घेतात.
दरवर्षी 35 ते 40 हजार सैनिक हे कठीण प्रशिक्षण पूर्ण करतात आणि मरीन कमांडो बनतात. प्रशिक्षण पूर्ण करण्यापूर्वी फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करावी लागते आणि त्यानंतर त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. जो या फिटनेस टेस्टमध्ये नापास होतो त्याला प्रशिक्षणासाठी अनफिट मानले जाते.
या कमांडो अशा प्रकारे प्रशिक्षण दिले आहेत की, तुमचे डोळे लवण्याच्या आत ते कोणालाही संपवू शकतात. त्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली प्रत्येक शस्त्रे आहेत आणि त्यांना मिसाईल सोडण्याचे प्रशिक्षणही देण्यात येते.