90 लाख लोकांनी पाहिला Content Creator चा व्हिडीओ... ज्यामुळे सुनावली तुरुंगाची शिक्षा

प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे काही नियम आणि मर्यादा असतात.

Updated: Jul 11, 2021, 05:51 PM IST
90 लाख लोकांनी पाहिला Content Creator चा व्हिडीओ... ज्यामुळे सुनावली तुरुंगाची शिक्षा title=

मेक्सिको : सोशल मीडियावर वर्चस्व गाजविण्याच्या स्पर्धेत तसेच आपले फॉलोवर्स वाढवण्यासाठी कंटेंट क्रिएटर्स (Content Creator) किंवा influencer आजकाल आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर दररोज काही ना काही शेअर करत असतात. सोशल मीडियावरील आपल्या पोस्टला शेअर, कमेंट्स आणि लाईक्स मिळण्यासाठी काही वेळा हे लोकं निगेटिव्ह कंटेट किंवा विवादात्मक कंटेंट देखील पोस्ट करतात. परंतु प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे काही नियम आणि मर्यादा असतात. त्याचप्रमाणे हे बनवलेले नियम मोडल्यानंतर शिक्षेचीही तरतूद केली आहे.

अशाच एका विवादात सध्या मेक्सिकोमधील एक यू ट्यूबर अडकली आहे. ज्यामध्ये एका वादग्रस्त व्हिडीओमुळे तिला कारागृहात जावे लागले आहे.

मेक्सिकोमधील (Mexico)प्रसिद्ध यू ट्यूबर योस हॉफमॅनचं(Yoss Hoffman) 'योसॉस्टॉप' (YosStop) नावाचे एक यूट्यूब चॅनेल आहे. त्यावर तिचे जवळपास 90 लाख फॉलोअर्स आहेत.

अलीकडे योस हॉफमनने चाइल्ड पोर्नोग्राफी (Child Pornography) कंटेंट पोस्ट केल्याबद्दल तिला तुरूंगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खरेतर योस हॉफमनने आपल्या चॅनेलवर 16 वर्षाच्या मुलीच्या बलात्काराचा (Child Rape Video)व्हिडीओ शेअर केला होता.

YouTuber वर अशाप्रकारचे विवादास्पद कंटेंट शेअर करण्यावर  बंदी लावण्यात आली आहे. परंतु तरीही योस हॉफमनने हा चाइल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ शेअर केला, ज्यामुळे तिने या मुलीची बदनामी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे योसवर कारवाई केली गेली आणि तिला 14 वर्षीची तुरुंगाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

यानंतर योस हॉफमन स्वत: साठी न्यायाची अपेक्षा करत आहे. ती म्हणत आहे की, फक्त व्हिडीओ पोस्ट केल्याने तिला गुन्हेगार ठरवू शकणार नाही. जरी YouTube त्याच्या धोरणाबद्दल कठोर असले तरी अशा परिस्थितीत माझे जगणे अवघड आहे. त्यामुळे या कारणासाठी तिला इतकी कठोर शिक्षा देणं योग्य नाही.