एक कल्पना अशी ही....नर्सने वॅक्सीनच्या रिकाम्या बाटल्यांपासून बनवला सुंदर झुंबर

 हे झुंबर पाहाताना तुम्हाल ते इतके सुंदर दिसेल आणि त्याच्या सुंदरतेत तुम्ही असे काही हरवून जाल की...

Updated: Sep 7, 2021, 01:38 PM IST
एक कल्पना अशी ही....नर्सने वॅक्सीनच्या रिकाम्या बाटल्यांपासून बनवला सुंदर झुंबर title=

लंडन : जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजवला होता. यामुळे अनेक लोकांनी आपले प्राण गमावले तर अनेकांचं खूप आर्थिक नुकसान झालं. या वाईट काळात एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे कोरोना लसीचा शोध. लसीच्यामाध्यमातून लोकं या धोकादायक साथीला पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कठीण काळात जिथे आघाडीचे कोरोना वॉरियर आपल्या प्राणांची पर्वा न करता चोवीस तास लोकांची सेवा करत आहेत.

अलीकडेच एका नर्सने कोरोना लसीच्या रिकाम्या कुपी किंवा बाटल्या वापरून एक भव्य आणि सुंदर असं एक झुंबर तयार केले आहे. हे झुंबर पाहाताना तुम्हाल ते इतके सुंदर दिसेल आणि त्याच्या सुंदरतेत तुम्ही असे काही हरवून जाल की, ते लसींच्या खाली बाटल्यांपासून दे बनवले गेले आहे असे तुम्हाला वाटणार देखील नाही.

एका रिपोर्टनुसार, ज्या नर्सने कोरोना लसीच्या रिकाम्या बाटल्यांमधून झूंबर बनवले, या नर्सचे नाव लारा वेसिस आहे आणि ती अमेरिकेतील कोलोराडोची आहे. लसीची रिकामी कुपी पाहिल्यानंतर त्याच्या मनात विचार आला की, याला कसं वेगळ्या पद्धतीने वापरू शकतील?  यानंतर, लाराने त्याचे भव्य झुंबर तयार करण्याचा विचार केला. यासाठी तिने काही तारांचा वापरही केला आहे.

लाराने प्रथम एक फ्रेम विकत घेतली आणि त्यावर लसीच्या कुपी लटकवल्या आणि त्यात लाईट्स टाकल्या यानंतर, त्या लाईट्सशी सगळ्या कुप्या जोडून आणि त्याला तारा लावून लारा ने हे झुंबर तयार केले, जे खूपच सुंदर आहे.

लाराने सांगितले की तिला लसीच्या कुपींसह प्रकाश वापरून काहीतरी करायचे आहे. ती म्हणाले की, "हे वर्ष इतक्या लोकांसाठी अडचणींनी भरलेले होतं, त्यामुळे कोरोनामुळे ज्यांच्या जीवनात अंधार झाला आहे त्यांच्या आयुष्याला झुंबरच्या माध्यमातून प्रकाश द्यायचा आशी माझी इच्छा होती आणि म्हणून हा झुंबर अशा लोकांसाठी मी समर्पीत करते."

लारा वेसिस आता निवृत्त झाली आहे. परंतु तिच्या प्रकारामुळे ती आता पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.