एका फोटोमधील प्रतिबिंबामुळे Girlfriendने आपल्या Boyfriendला 'रंगे हात पकडले'

खरेतर आपल्या गर्लफ्रेंडला फोटो पाठवत त्याने तिला सांगितले की, तो त्याच्या मित्रांसोबत घरी ओलंपिक पाहात आहे. 

Updated: Jul 27, 2021, 05:32 PM IST
एका फोटोमधील प्रतिबिंबामुळे Girlfriendने आपल्या Boyfriendला 'रंगे हात पकडले'

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रेमी जोडपे किंवा नवीन लग्न झालेले जोडपे पुरेपुर फायदा करुन घेतात. त्यावर ते दिवस भरात काय काय करतात काय खातात, कुठे फिरायला जातात हे एकमेकांना शेअर करतात. परंतु यामुळे एका प्रेमी जोडप्याचं नातं तुटलं आहे. 

एका व्यक्तीला आपल्या मैत्रिणीशी खोटे बोलणे खूप महागात पडले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडला त्याचा एक फोटो पाठवला आणि तिला खात्री करुन देत होता की, तो त्याच्या घरीच आहे. परंतु त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला काही सेकंदात पकडलं आणि त्याच्या या फोटोला सोशल मीडिया साईटवरुन व्हायरल केलं आहे.

खरेतर आपल्या गर्लफ्रेंडला फोटो पाठवत त्याने तिला सांगितले की, तो त्याच्या मित्रांसोबत घरी ओलंपिक पाहात आहे. परंतु जेव्हा गर्लफ्रेंडने त्या फोटोला झूम करुन पाहिले तेव्हा त्यात जे काही गर्लफ्रेंडने पाहिले त्यामुळे त्या बॉयफ्रेंडची पोल खोलली.

एका मीडिया वृत्तानुसार, टिकटॉकच्या यूझर मेगन मेरीने तिच्या बॉयफ्रेंडने तिला पाठवलेला फोटो शेअर केला आहे आणि म्हटले की, तो घरी इतर मुलांसमवेत ऑलिम्पिक पहात आहे आसे त्याने सांगितले. परंतु जेव्हा मेगनने फोटो झूम केला, तेव्हा तिला सर्व काही स्पष्ट झाले.

फोटो झूम केल्यानंतर मेगनला कळले की, तिचा प्रियकर खोटे बोलत आहे आणि तो दुसर्‍या एका मुलीसोबत घरी आहे.

मेगन मेरीच्या बॉयफ्रेंडने टीव्ही पाहतानाचा फोटो पाठवला. परंतु जेव्हा मेगनने त्याफोटोला काळजीपूर्वक पाहिले तेव्हा तिला फोटोमधील काचेच्या कॅबिनेटवर एक प्रतिबिंब (Reflection) दिसले. तेव्हा तिने त्या फोटोला झूम करुन पाहिले असता, तिला त्यामध्ये रेड वाईनचा ग्लास दिसला तसेच त्यामध्ये एका मुलीचा गुडघा देखील तिला दिसला. यानंतर तिचा बॉयफ्रेंड तिची फसवणूक करत आहे हे समजण्यासाठी मेगनला वेळ लागला नाही.

फोटोमध्ये पुस्तके देखील दिसली

टिक्टक यूजरच्या बॉयफ्रेंडचा फसवणूकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बरेच लोक मेगनच्या या कौशल्यांचे कौतुक करत आहेत. मेगनने रेड वाईन तसेच फोटोमध्ये काही पुस्तके देखील दिसली. तिच्या बॉयफ्रेंडकडे कोणतीही पुस्तके नाही, त्यामुळे ते पुस्तक त्या मुलीचे असू शकते ज्या मुलीला तिचा बॉयफ्रेंड डेट करत आहे.

आता या सोशल मीडियावर मेगनने शेअर केलेल्या फोटोखाली एका सोशल मीडिया यूझरने सगळ्यांनी त्यांच्या जोडिदाराच्या वागण्यावर देखील असे बारीक लक्ष ठेवण्यासाठी सुचवले आहे. तर काहींनी त्यांच्या सोबत घडलेले किस्से देखील शेअर केले आहे.