Nail Cutter Safe Mode Video: आपल्या घरातील अनेक दैनंदिन वापरातील गोष्टींबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी ठाऊक नसतात. अनेकदा सोशल नेटवर्किंगवर या गोष्टींसंदर्भातील रंजक फॅक्ट्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी भाज्या कापतो तो कटींग बोर्ड तर कधी सुरी संदर्भातील हॅक्स म्हणजेच स्मार्ट टीप्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आले नेल कटरचा.
नेटलकटर तसं म्हणायला गेलं तर महिन्यातून किमान एकदा तरी वापरली जाणारी गोष्ट. नेल कटरचेही आकारानुसार लहान, मोठे अनेक प्रकार असतात. अगदी किचैनमध्येही छोट्या आकाराचं नेल कटर मिळतं. लहान मुलांसाठी विशेष छोटी नेल कटर मिळतात. घरातील छोट्या मुलांच्या हाती नेल कटर असो किंवा सुरी किंवा कोणतीही धारधार वस्तू पडू नयेत म्हणून आपण अनेकदा काळजी घेतो. या गोष्टी लहान मुलांचा हात पुरेल तिथून दूर ठेवण्यापासून ते या वस्तू लपवून ठेवण्यापर्यंत अनेक प्रयत्न पालक करताना दिसतात. मात्र प्रत्येक नेल कटरमध्ये सेफ्टी फिचर असं असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे. याच नेलटकरीमधील लॉकबद्दलचं प्रात्यक्षिक दाखवणारा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
"नेल कटरमध्येही सेफ मोड असतो हे तुम्हाला समजलं तेव्हा तुम्ही किती वर्षांचे होता?" अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 4 लाख 44 हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत. तर 500 हून अधिक रिट्वीट्स आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आम्हाला यासंदर्भात काहीच कल्पना नव्हती असंही म्हटलं आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ मोबाईल फोनवर शूट करण्यात आला आहे. एका व्यक्तीने हातात नेल कटर पकडल्याचं दिसत आहे. नेल कटरची समोरची फट उघडी असल्याचं यात दिसत आहे नंतर ही व्यक्ती नेल कटरचा वरचा बंद असलेला खटका दाबून वरील भाग अंगठ्याने हळूच पुढे ढकलते. त्यानंतर ही फट बंद होते असं व्हिडीओत दिसत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
How old were you when you found out that some nail cutter's have a safe mode? pic.twitter.com/FUYkvRUT5H
— CCTV IDIOTS (@cctvidiots) August 1, 2023
तुम्हाला नेल कटरमधील या फिचरबद्दल कल्पना होती का? कमेंट करुन नक्की कळवा.