Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधण्यासाठी खास तयार केले जातात. तर काही व्हिडीओ हे रियल घटनेशी संबंधित असतात. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ पाहून आपण थक्क राहून जातो. निसर्गाचे चमत्कार दाखवणारेही अनेक व्हिडीओ आपण पाहिली आहेत. सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे यूजर्ससह अनेक लोक आर्श्चचकित झाले आहेत.
सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये जे काही दिसलं, ते पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या व्हिडीओतील दृष्य एका पायलटने अनुभवलं आहे. एका पायलटला ढगांच्या मध्यभागी एक लाल रंगाचा दिवा दिसला. हे दृष्य पाहून पायलट अवाक झाला. सोशल मीडिया प्लॅलफॉर्म ट्विटरवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. अटलांटिक महासागरावरील रहस्यमय लाल चमकीचा व्हिडीओ, असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये देण्यात आलं आहे.
सोशल मीडियावरील या व्हिडीओमधील लाल दिव्यामागील रहस्य कोणालाच माहिती नसल्यामुळे लोकांमध्ये वेगवेगळी चर्चा रंगली आहे. काही लोक म्हणत आहेत की, ''हे जगाच्या अंताचे संकेत आहे.'' तर काही लोक म्हणतात की, ''हे खूपच भयानक आहे.'' अनेकांनी याचा संबंध भूतांशीदेखील जोडला आहे.
हा एक प्रकारचा अटलांटिक सॉरेल आहे. जो सहसा सेंट लॉरेन्सच्या आखात, कॅनडा ते बर्म्युडापर्यंत दिसून येतो. विशेष म्हणजे या ठिकाणी जहाजांच्या परिघाभोवती शेकडो लाल दिवे वापरून मासे पकडले जातात. हा व्हिडीओतील लाल दिवा या तर्काशी जोडला जाऊ शकतो.
Video footage of a mysterious red glow over the Atlantic Ocean pic.twitter.com/jHTtnLUlRm
— MONEYWAY (@skylawhylaa) July 20, 2022
आतापर्यंत हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि अनेकांनी तो लाइकसुद्धा केले आहे. तर अनेक यूजर्स कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.