कोरोना वॉरियर नर्सने रुग्णांना प्रोत्साहित करण्यासाठी जे केलं, ते पाहून रुग्णांचे मनोधैर्य आनखी उंचावले......

जगभरातील कोरोनाचे रुग्ण दररोज वाढतच आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

Updated: May 3, 2021, 05:18 PM IST
कोरोना वॉरियर नर्सने रुग्णांना प्रोत्साहित करण्यासाठी जे केलं, ते पाहून रुग्णांचे मनोधैर्य आनखी उंचावले...... title=

कॅनडा : जगभरातील कोरोनाचे रुग्ण दररोज वाढतच आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना वॉरियर्सवरील ताणही लक्षणीय वाढला आहे. परंतु या कठीण परिस्थितीत ते त्यांचे दु:ख आणि वेदना विसरुण ते केवळ रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतात. अशा परिस्थितीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये कोरोना वॉरियर नर्सने जे केले ते खरोखरचं कौतुकास्पद आहे. या नर्सने रुग्णालयातील रुग्णांच्या करमणुकीची काळजी घेत रुग्णांसमोर गाणे गायले आहे.

कॅनडामधील ओटावा रूग्णालयातील हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आयसीयूमधील एक नर्स रूग्णांसाठी गाणी गाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये, आपण पाहू शकता की, ही नर्स गिटारसह एक गाणे गात आहे आणि रुग्णांना प्रोत्साहन देत आहे. ज्यामुळे हे रुग्ण देखील आपले सगळे दु:ख विसरुन तिच्या गाण्यावर ताल धरत आहेत. ओटावा रूग्णालयातील एंडोस्कोपी नर्स अ‍ॅमी लिनही रुग्णांना आनंद देण्यासाठी ’You are not alone’ म्हणजेच 'तु एकटा नाहीस' हे गाणे गात आहे. आणि रुग्णांचे मनोरंजन करण्याबरोबर त्यांना प्रोत्साहन देत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ओटवा हॉस्पिटलने नर्सच्या गाण्याचा हा भावनिक व्हिडीओ आपल्या ट्वीटर पेजवर शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडीओ केवळ आवडतच नाही, तर हा व्हिडीओ या प्रतिकूल परिस्थितीत लोकांना हसवत आणि प्रोत्साहित करत आहे. लोकं कमेन्ट्सच्या माध्यमातून अ‍ॅमीच्या या कार्यास सलाम करत आहेत. लोकं मोठ्या प्रमाणावर या व्हिडीओला शेअर करत आहे आणि शूर कोरोना वॉरियर्सचे कौतुक आणि आभार देखील मानत आहेत.