एक छोटी चूक या महिलेच्या बेतली जीवावर, केसांनी घेतला पेट पाहा थरारक व्हिडीओ

स्वयंपाकघरात काम करताना सावधान! नाहीतर या महिलेसारखं तुमच्यासोबतही होऊ शकतं पाहा व्हिडीओ

Updated: Sep 27, 2021, 10:56 PM IST
एक छोटी चूक या महिलेच्या बेतली जीवावर, केसांनी घेतला पेट पाहा थरारक व्हिडीओ

मुंबई: स्वयंपाक घरात काम करताना आपल्याला खूप जपून काम करावं लागतं. बऱ्याचदा आपले कपडे, केस आणि सर्व गोष्टी अगदी सांभाळून कराव्या लागतात. आपली एक छोटी चूक महागात पडू शकते याचं भान तिथे काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला असतंच. मात्र कधीतरी लक्षात येत नाही आणि मग ती चूक महागात पडते. अशीच एक घटना या महिलेसोबत घडली आहे. 

स्वयंपाक घरात काम करत असताना तिने गॅसवर भांडी ठेवली. त्यानंतर ती ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधत आहे. वस्तू ठेवत आहे याच दरम्यान तिच्या केसांनी पेट घेतला. या महिलेला एक क्षण आपल्या केसांना आग लागल्याचं कळलंच नाही. महिलेच्या लक्षात आल्यानंतर ती खूप घाबरली तिने आग विझवण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओवरून लक्षात येत आहे की स्वयंपाकघरात काम करताना काळजी घेणं खूप आवश्यक आहे.

@suryanandannet नावाच्या ट्वीटर यूझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ भारतातील नसल्याचं दिसत आहे. मात्र या व्हिडीओतून मिळणारा संदेश खूप मोलाचा आहे. स्वयंपाकघरात काम करताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा जीवावर बेतू शकतं हे लक्षात घ्यायला हवं.

विशेष सूचना- हा व्हिडीओ व्हायरल व्हिडीओ आहे झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही.