अरे देवा! ऑनलाइन कपडे विकण्यासाठी झोपलेल्या पतीला बनवलं मॉडेल

कपडे विकण्यासाठी काहीपण...महिलेनं झोपलेल्या पतीलाच बनवलं मॉडेल

Updated: Jan 30, 2021, 08:34 PM IST
अरे देवा! ऑनलाइन कपडे विकण्यासाठी झोपलेल्या पतीला बनवलं मॉडेल title=

मुंबई: आपली वस्तू विकण्यासाठी काय आयडिया लढवली जाईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट पोस्ट व्हायरस होत आहे. या पोस्टमध्ये चक्क पत्नीने झोपलेल्या पतीला मॉडेल केलं आहे. ऑनलाइन कपडे विकण्यासाठी पत्नीनं आपल्या झोपलेल्या पतीला मॉडेल केलं आणि त्याच्य़ा अंगावर वेगवेगळे कपडे घालून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

जसं आपण खरेदीला जात असताना पुतळ्याला कपडे लावलेले पाहातो. अगदी तसेच या पत्नीने आपल्या पतीच्या अंगावर कपडे ठेवले आणि त्याचे फोटो काढून पोस्ट केले. हा संपूर्ण प्रकार पाहून लोकही हैराण झाले आहेत. हा संपूर्ण प्रकार या महिलेनं ऑनलाइन कपडे विकण्यासाठी केल्याची माहिती मिळाली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे.

 

No mannequin No problem Effort is the key mga Sis Hindi pwedeng walang ambag mga asawa natin no Hahaha ganto na uso ngayon kung pano Magbenta

Posted by on Monday, 25 January 2021

ही महिला फिलिपाइन्समध्ये ऑनलाइन बुटिक चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. तिने आपल्या पतीचे फोटो jo ऑनलाइन शॉप नावाच्या फेसबुक पेजवर पोस्ट केले. त्यावर  'पुतळा नाही, काही हरकत नाही पण प्रयत्न केला आहे.' असं कॅप्शन या पोस्टवर लिहिलं आहे. या पोस्टवर आतापर्यंत 10 हजार लोकांनी रिअॅक्ट केलं आहे. 22 हजारहून अधिक लोकांनी शेअर केली आहे. 

अनेकांनी या महिलेनं वापलेल्या आयडियाचं कौतुक केलं आहे. या महिलेनं जेव्हा आपला पती शव आसन स्थितीत झोपलेला पाहिला तेव्हा त्यांना आपले कपडे ऑनलाइन विकण्याची एक भन्नाट आयडिया सुचली. त्यांनी आपल्या पतीच्या अंगावर कपडे लावून फोटो काढले. तर काही ड्रेस पतीच्या अंगावर चढवून महिलेनं फोटोशूट केलं. महिलेनं हे फोटो फेसबुकवर अपलोड केल्यानंतर तुफान व्हायरल झाले आहेत.

Tags: