इस्रायल हल्ल्यामागाचा मास्टरमाईंड व्लादीमीर पुतीन; युद्धस्थितीबाबत धक्कादायक खुलासा

इस्रायलला  हल्ल्याचं पुतीन कनेक्शन उघड झाले आहे. हल्ल्याचं प्रायोजक इराण, मास्टरमाईंड पुतीन असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. 

Updated: Oct 9, 2023, 10:57 PM IST
इस्रायल हल्ल्यामागाचा मास्टरमाईंड व्लादीमीर पुतीन; युद्धस्थितीबाबत धक्कादायक खुलासा   title=

Israel war : असं मानलं जातंय की इस्रायल हल्ल्यासाठी हत्यारं इराणनं पुरवली.. एका थिअरीनुसार इराणनं रशियाच्या सांगण्यानुसार इस्रायलवर हल्ल्याची योजना बनवली.. मात्र इस्रायल हल्ल्याचं पुतीन कनेक्शन काय आहे, रशियाला इस्रायलवरच्या हल्ल्यात इतका इंटरेस्ट का होता जाणून घेवूया. 

इस्रायलवर हल्ला हमासनं केला मात्र नुकत्याच समोर आलेल्या थिअऱीनुसार या हल्ल्यामागे मास्टरमाईंड रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन आहेत आणि प्रायोजक आहे इराण.. सुमारे 2 वर्षांपासून या हल्ल्याची तयारी सुरु होती असंही समोर येतंय.. हल्ल्याची युद्धभूमी गाझापट्टी असली तर रणनीती रशियाच्या क्रेमलिनमध्ये ठरली होती असं सांगितलं जातंय. मात्र इस्रायलवरच्या हल्ल्यात व्लादीमीर पुतीनना इतका इंटरेस्ट का होता यामागची अनेक कारणे समोर आली आहेत. 

हल्ल्याचं पुतीन कनेक्शन काय? 

अमेरिकेनं युक्रेन युद्धात उघडपणे रशियाविरोधात आघाडी उघडली आहे.  युक्रेनला मदत केल्याबद्दल पुतीनना अमेरिकेला धडा शिकवायचा होता. अमेरिकेला झटका देण्यासाठी मित्रराष्ट्र इस्रायलवरील हल्ल्याला रशियानं मदत केली. यासाठी रशियानं इराणला पद्धतशीरपणे मदत केली. मानलं जातंय की इस्रायलच्या आयर्न डोम सिस्टिमची दिशाभूल करण्यासाठी जी 5000 छोटी मिसाईल्स डागली गेली ती इराणमधून गाझापट्टीत आणली गेली होती.
इस्रायलवरच्या या हल्ल्यासाठी दिवसही खास निवडण्यात आला होता. हल्ल्यासाठी दिवस निवडण्यात आला 7 ऑक्टोबर आणि त्यामागेही पद्धतशीर प्लॅनिंग होती.

हल्ल्याचं 7 ऑक्टोबर कनेक्शन काय?

7 ऑक्टोबरला व्लादीमीर पुतीन यांचा जन्मदिवस असतो. याचदिवशी अमेरिकेच्या साथीनं रशियाच्या मोक्याच्या ठिकाणी हल्ला करण्याचा युक्रेनचा प्लॅन होता. मात्र, 7 ऑक्टोबरलाच सकाळी साडेसहा वाजता इस्रायलवरील हल्ल्यानं अमेरिका चक्रावली. यापूर्वीही 7 ऑक्टोबर 1973 या दिवशीच इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला झाला होता. यौम-ए-किप्पूर सणाच्यादिवशी इस्रायलवर हल्ला झाला होता.  6 अरब राष्ट्र एकत्र येत इस्रायलवर तुटून पडली होती.  1973 चं युद्ध 25 ऑक्टोबरपर्यंत चाललं होतं. मात्र, हमास हल्ल्यामुळे छेडलं गेलेलं युद्ध महायुद्धाची ठिणगी बनू शकतं.. कारण यात रशिया आणि इराण थेट सहभागी असल्याची थिअरी समोर येत आहे.