Weird Tradition : 'या' ठिकाणी नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायको करते अश्लील डान्स, विचित्र प्रथेने सगळे अवाक्

Weird Tradition : आयुष्याचा जोडीदार जेव्हा मृत्यूला कवटाळतो यापेक्षा मोठं दु:ख नाही. अश्रूंचा धारा आणि आयुष्य नकोस वाटतं. पण या ठिकाणी नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोला अश्लील डान्स करावा लागतो. ही कुठली विचित्र प्रथा...

Updated: Aug 6, 2023, 07:07 PM IST
Weird Tradition : 'या' ठिकाणी नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायको करते अश्लील डान्स, विचित्र प्रथेने सगळे अवाक् title=
Weird Tradition husband death wife obscene dance in funeral ritual in china

Weird Tradition : कुटुंबातील सदस्याचं जाणं हा सर्वात दुःखाचा क्षण असतो. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतं. जोडीदाराच्या जाण्याने सगळ्यात जास्त खचते ती त्याची सात जन्म साथ देणारे व्यक्ती. त्या व्यक्तीला आता आपण कोणासाठी जगायचं, काय करायचं असं प्रश्न त्या व्यक्तीसमोर उभे राहतात. आता जगात फक्त काळखो आहे, या अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी कुटुंबातील सदस्य मदत करता खरं पण या दु:खातून बाहेर येणं तेवढं सोपं नसतं. (Weird Tradition husband death wife obscene dance in funeral ritual in china)

समाज आणि धर्मानानुसार अंत्यसंस्काराचे वेगवेगळ्या प्रथा असतात. पूर्वी सती जाण्याची विचित्र प्रथा अनेक वर्ष सुरु होती. पण यातून महिलांची मुक्तता झाली. पण या ठिकाणी चक्क एखाद्याच्या मृत्यूनंतर अश्लील डान्स केला जातो. धक्कादायक म्हणजे नवऱ्याच्या मृत्यूनंतर पत्नीने अशाप्रकारचे अश्लील डान्स शो केले जातात. (strip dance in funeral)

ऐकून धक्का बसला ना. तसाच धक्का आम्हाला ही बसला. आजही या देशात अशी विचित्र प्रथा कशी काय सुरु आहे. ही अंत्यसंस्काराची विचित्र प्रथा चीनच्या ग्रामीण भागातील आहे. ही खूप जुनी परंपरा असूनही आजही परंपरा निभावली जाते. 

बदलत्या काळानुसार अनेक समाजातील अनेक विचित्र प्रथा बंद किंवा थोडा बदल्या आहेत. पण ही भयानक प्रथा इथे आजही पाळली जाते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्ट्रिप डान्सर्सना बोलावलं जातं. या अंत्यसंस्कार विधी दरम्यान त्या व्यक्तीची बायकोही अश्लील डान्स करते आणि रडण्याचं नाटक करते. 

'या' विचित्र प्रथामागे हे आहे कारण!

अंत्यसंस्कारच्या विचित्र प्रथेमागील कारण काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर चीनमधील या प्रथेमागे त्या लोकांचं असं म्हणं आहे की, मृत व्यक्तीला चांगल्या प्रकारे शेवटचा निरोप देण्यासाठी हे सगळं केलं जातं. त्याशिवाय अंत्यसंस्काराला गावातील जास्त जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठी यावं हाच या प्रथेमागील उद्देश आहे. या लोकांची अशी मान्यता आहे की, अंत्यसंस्काराला जितकं जास्त लोक असतात तितकंच मृताच्या आत्माला जास्त शांती मिळते.