कुख्यात लैंगिक गुन्हेगारातील आरोपी जेफ्री एपस्टीनशी संबंधित काही कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आली आहेत. या कागदपत्रांमधून धक्कादायक खुलासे झाले असून, जेफ्रीशी जवळीक असणाऱ्यांची ओळख पटली आहे. या कागदपत्रांमधून अनेक हाय-प्रोफाइल नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये मसलन, प्रिंस एंड्र्यू, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन आणि डेविड कॉपरफील्ड अशी नावं आहेत.
एका प्रकरणी सुनावणीदरम्यान ही कागदपत्रं सादर करण्यात आली. यामध्ये व्हर्जिनिया गिफ्रे हिच्या वतीने घिसलेन मॅक्सवेलविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात त्याला हजर करण्यात आलं. घिसलेन मॅक्सवेल हा जेफ्री एपस्टाईनचा पार्टनर होता. एपस्टाईनच्या आत्महत्येनंतर आता त्याच्याविरुद्ध हा खटला सुरू आहे. मॅक्सवेलवर एपस्टाईनला मुली पुरवल्याचा आरोप आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या कागदपत्रांमध्ये एकूण 90 लोकांची नावं आहेत. या लोकांवर कोणत्याही चुकीच्या कृत्यात सहभागी होण्याचा आरोप नाही. पण हे लोक एपस्टीनचे निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जात आहे. सुनावणीदरम्यान, मॅक्सवेल यांनी सांगितलं की प्रिंस एंड्यू हे एपस्टीनच्या आयलँडवर पोहोचले होते. एपस्टीनवर याच आयलँडवर अनेक तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
या कागदपत्रांमध्ये लैंगिक शोषण झालेल्या पीडित तरुणींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. यामधे एका पीडितेने सांगितलं आहे की, बिल क्लिंटन यांना तरुण मुली आवडत असल्याचं एपस्टीनने तिला सांगितलं होतं. 2019 मध्ये बिल क्लिंटन यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपले एपस्टीनशी काही संबंध नसल्याचा दावा केला होता. यातच पीडितेने आपल्या जबाबात सांगितलं आहे की, एपस्टीनच्या पाम बीच मँशनमध्ये तिची भेट मायकल जॅक्सन आणि प्रसिद्ध जादूगर डेव्हिड कॉपरफिल्डशी झाली होती.
याच कागदपत्रांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याही नावाचा उल्लेख आहे. पीडितेने आपल्या जबाबात सांगितलं आहे की, एपस्टीनच्या घऱी तिची मुलाखत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झाली होती. जेव्हा तिला तू डोनाल्ड ट्रम्प यांना मसाज दिलीस का? असं विचारलं असता तिने नाही असं उत्तर दिलं.
नाओमी कॅम्पबेल, लिओनार्डो डिकॅप्रियो, ब्रॅडली एडवर्ड्स, लुईस फ्रीह, स्टीफन हॉकिंग, जॉर्ज लुकास, जेसन रिचर्ड्स, केविन स्पेसी, ब्रूस विलिस आणि डॅनियल विल्सन यांच्या नावांचाही या कागदपत्रांमध्ये समावेश आहे.
एपस्टीनने अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. एपस्टीनवर मॅनहॅटन, पाम बीच, फ्लोरिडा आणि सेंट थॉमस जवळील त्याच्या खासगी बेटावर गुन्हे केल्याचा आरोप आहे. एपस्टीनला 2019 मध्ये तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. एपस्टीनने तुरुंगात आत्महत्या केली होती. ज्यानंतर एपस्टीनविरुद्धचा खटला रेकॉर्डवरुन काढण्यात आला होता. त्याचा मित्र घिसलेन मॅक्सवेल डिसेंबर 2021 मध्ये दोषी आढळला होता. मॅक्सवेलला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.