नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही अशा अनेक राजांबद्दल ऐकलं असेल ते त्यांच्या क्रूरतेसाठी प्रसिद्ध आहेत. अमेरिकेच्या इतिहासात जिम जोन्सचे नाव अशाच एका घटनेशी संबधित आहे.
39 वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला हलवून टाकले होते. जेव्हा 900 पेक्षा जास्त जणांनी आत्महत्या केल्या होत्या. जिम जोन्स साम्यवादी विचारधारेचा होता. तो स्वत:ला देवदूत म्हणायचा. 1956 मध्ये त्यांनी पीपल्स टेम्पल नावाचा चर्च बांधला होता, ज्याचा हेतू गरजू लोकांना मदत करणे होता. त्याने पुष्कळ लोकांना आपले फॉलोअर्स बनवलं. इंडियानावरुन जिमने कॅलिफोर्नियामध्ये त्याचा चर्च शिफ्ट केला.
जिमचे विचार अमेरिका सरकारच्या विरोधात होते. म्हणून त्यांने दक्षिण अमेरिकेत जाऊन आपल्या फॉलोअर्स सोबत गुयानामध्ये स्थायिक झाला. लोकांकडून 11 तासांपेक्षा जास्त काम करुन घेतले जात होते. एवढेच नाही तर रात्रीच्या वेळी स्पीकरवर सुरु असलेल्या जिमच्या भाषणामुळे कोणीच झोपू शकत नव्हते. अमेरिकन सरकारने जेव्हा लोकांना तेथून काढण्याचा प्रयत्न केला तर जिमने लोकांना एकत्रपणे आत्महत्या करण्याचे आदेश दिले. यानंतर अनेकांनी विष प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाला तर ज्यांनी आत्महत्या नाही केली त्यांना जबरदस्त विष पाजून मारण्यात आलं.
18 नोव्हेंबर 1978 रोजी ही दु:खदायक घटना घडली होती. ज्यामध्ये 900 लोकांचा मृत्यू झाला होता. 276 मुलांचा य़ामध्ये समावेश होता. जेव्हा अमेरिकन सेना तेथे पोहोचली तेव्हा तिथे फक्त प्रेत दिसत होते.
जॉन्सटाउनमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेच्या सरकारने काही लोकांना तेथे पाठवलं पण जिमने लोकांना सांगितलं की सरकार तुमच्यावर बॉम्ब हल्ला करणार आहे. तुमच्या मुलांना पकडून त्यांच्यावर अत्याचार करणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच आत्महत्या करा. यासाठी जिमने एक विष बनवलं आणि ते सगळ्यांना प्यायला लावलं ज्यानंतर ५ मिनिटात सगळ्यांचा मृत्यू झाला.