Who Is MC Baba Rapper: सोशल मीडियाच्या क्रांतीपासून अनेक लोक प्रसिद्धीच्या झोतात आले. एखादा व्हिडीओ किंवा रिल व्हायरल झाला की अनेकजण खूप कमी कालावधीत स्टार होतात. प्रसिद्धीचं वलय निर्माण झाल्यानंतर सोशल मीडियाचं वेड हायसं वाटतं. काही लोकांनी याचा फायदा घेतला अन् खिसे भरले तर अनेकजण इंटरनेटच्या मायाजाळात अडकले गेले. पण अनेकांनी आपली एक वेगळी निर्माण केलीये. अशातच एक नाव सध्या चर्चेत आहे. ते म्हणजे रॅपर एमसी बाबा...! एमसी बाबाची ढासू स्टोरी ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.
रॅपर म्हटलं की, गळ्यात मोठ्या साखळ्या, चेहऱ्यावर गॉगल, रंगेबिरेंगी जॅकेट असा चेहराच तुमच्या डोळ्यासमोर आला असेल. माईक तोंडासमोर धरून ठेका धरणारे रॅपर तुम्ही पाहिले असतील. मात्र, ऐकायला येत नाही आणि बोलायला येत नाही, असा रॅपर तुम्ही ऐकलाय का? होय, तुम्हाला तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही, पण असा एक रॅपर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
एमसी बाबा मूळचा आफ्रिकेचा आहे आणि व्यवसायाने तो रॅपर आहे. आवाज आणि ऐकायला जरी येत नसलं तरी एमसी बाबाने संगित क्षेत्र निवडलं अन् आपलं नाव कमावलं. एम सी बाबाने अल्पावधीतच आपला ठसा उमटवला. जेवढा उच्चार होतो, त्यावर भर देऊन वेगवेगळे बीट निर्माण करण्यावर त्याने भर दिला अन् आज तो देश विदेशात नाव कमावतोय. सहकाऱ्यांच्या साथीने त्याने रॅपर म्हणून करियर करण्यास सुरूवात केली होती.
Congo has produced Africa's first mute Rapper named MC Baba. pic.twitter.com/6BPpQU7UFG
— Africa Facts Zone (@AfricaFactsZone) June 5, 2024
दरम्यान, हृदयाच्या हार्टबिटवरून त्याने रॅप तयार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे अनेक लोक त्याच्यामुळे प्रभावित होतात. एमसी बाबांनी 'डेफ हॉप' या त्यांच्या खास सिग्नेचर स्टाइलने प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यामुळे त्याचे म्युझिक व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतात.