... म्हणून 'प्रिन्सेस ऑफ यॉर्क'च्या शाही विवाहसोहळ्यातील गाऊन ठरला खास

तिच्यासाठी सौंदर्य म्हणजे...

Updated: Oct 13, 2018, 12:43 PM IST
... म्हणून 'प्रिन्सेस ऑफ यॉर्क'च्या शाही विवाहसोहळ्यातील गाऊन ठरला खास  title=

मुंबई : रॉयल  वेडिंग म्हटलं की अनेकांचच लक्ष हे थेट ब्रिटनच्या राजघराण्याती लग्नांकडे जातं. प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांच्या शाही विवाहसोहळ्यानंतर आता ब्रिटनच्या राजघराण्याला किंबहुना साऱ्या जगालाच आणखी एका शाही विवाहसोहळ्याचं साक्षीदार होता आलं. 

हा विवाहसोहळा होता प्रिन्सेस यूजिनी आणि जॅक ब्रूक्सबँक यांचा. 

प्रिन्सेस युजिनीच्या विवाहसोहळ्याची सर्वत्र बरीच चर्चाही पाहायला मिळाली. 

मुख्य म्हणजे शाही विवाहसोहळ्याचा थाट आणि पाहुणे मंडळींची उपस्थितीच अनेकांचं लक्ष वेधून गेली. 

युजिनी ही राणी एलिझाबेथ द्वितीय यांची नात असून ब्रिटनच्या सिंहासनाची नववी दावेदार आहे. प्रिन्स अँड्र्यू आणि सारा फर्ग्युसन यांची ती कन्या आहे. 

युजिनीच्या विवाहसोहळ्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि चर्चिला गेलेला विषय ठरला तो म्हणजे तिचा वेडिंग गाऊन. 

The back of Princess Eugenie's wedding gown was the central talking point as she made her first appearance.

पीटर पिलोटोने डिझाईन केलेला हा गाऊन अनेक कारणांनी खास होता. त्यातीलच एक कारण म्हणजे त्याच्या गळ्याचा आकार. मागून आणि पुढून 'व्ही', 'V' आकारात असणाऱ्या या गाऊनचा गळा हा युजिनीच्या सांगण्यावरुन तशा प्रकारे तयार करण्यात आला होता. 

लांब बाह्यांच्या या आयव्हरी गाऊनची ट्रेलही बरीच लांब होती. फोल्ड शोल्ड आणि व्ही नेकमुळे त्याचं सौंदर्य हे आणखीनच खुलून दिसत होतं. 

लग्नाच्या दिवशी युनिजीने पारंपरिक टिआरासोबत जोक्यावरुन घेतात ती ओढणीही घेतली नव्हती. यामागे एक महत्त्वाचं कारण दडलेलं होतं. 

वयाच्या 12 व्या वर्षी युजिनीवलर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ज्याचे व्रण आजही तिच्या पाठीवर मानेखाली असण्याऱ्या भागात पाहायला मिळतात. 

The back of Princess Eugenie's wedding gown was the central talking point as she made her first appearance.

आपल्या शरीरावर असणारा हा व्रण उगाचच लपवून ठेवण्यापेक्षा तो सर्वांनाच दिसावा या हेतूनेत तिने लग्नासाठीच्या गाऊनचा गळा हा 'व्ही' आकारात साकारण्यास सांगितलं होतं. 

सौंदर्यायकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगळा असतो आणि तो काळानुरूप बदलण्याची गरज असल्याचं आयटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिने स्पष्ट केलं होतं. शरीरावरील व्रण दाखवत तिने हाच दृष्टीकोन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.