19 मजल्यावरुन पडूनही अशी वाचली महिली, अंगावर काटा उभा करणारा व्हिडीओ व्हायरल

ही महिला बिल्डिंगच्या 19व्या मजल्याच्या बाल्कनीतून पडली आहे.

Updated: Nov 25, 2021, 04:04 PM IST
19 मजल्यावरुन पडूनही अशी वाचली महिली, अंगावर काटा उभा करणारा व्हिडीओ व्हायरल

यांगझू : आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं असतं की, आपलं आकाशाला भिडणाऱ्या बिल्डिंगमध्ये एखादं सुंदरसं घर असावं. परंतु तुम्हाला हे माहित आहे की, की, या उंच इमारतीत राहणे किती धोकादायक असू शकते? प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू या असतातच. उंच इमारतीत राहणाच्या फायद्यांपेक्षा त्याचा धोका देखील जास्त असतो. सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला अंदाजा येईल की, उंच बिल्डिंगमध्ये राहणं किती धोकादायक आहे.

खरंतर हा व्हिडीओ चीनच्या जिआंगसू प्रांतातील यांगझू नावाच्या शहरातील आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक महिला उंच बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरती हवेत लटकली आहे. खरेतर ही महिला बिल्डिंगच्या 19व्या मजल्याच्या बाल्कनीतून पडली आहे. जी 17व्या मजल्यावर अडकली आणि तिचा जीव वाचवला गेला आहे.

खरेतर ही महिला बिल्डिंगच्या 19 व्या मजल्यावर राहते आणि ती कपडे धुतल्यानंतर बाल्कनीत कपडे सुकवत होती. तेव्हाच तिचा पाय बाल्कनीतून घसरला आणि ती थेट 18 व्या मजल्यावर पोहोचली. सुदैवाने महिलेचा पाय कपड्याच्या रॅकमध्ये अडकला. यावेळी त्याचे डोके, हात आणि धड 17 व्या मजल्यावर लटकले होते. ज्यामुळे तिचा जिव वाचला आहे.

हे दृश्य हृदय हेलावून टाकणारे आहे. हा बचावाचा व्हिडीओ तुम्ही पाहिलात तर तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल.

सुदैवाने महिलेला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहोचले, जिथे एका टीमने महिलेचे पाय 18व्या मजल्यावर धरले, तर दुसऱ्या टीमने 17व्या मजल्यावरून तिच्या अंगाला दोरी बांधली. अशाप्रकारे महिलेला सुरक्षितपणे वाचवण्यात बचावकर्त्यांना यश आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महिला वृद्ध असल्यामुळे ती थकली होती, परंतु तिला गंभीर दुखापत झाली नाही.

या घटनेच्या तपासात महिला कपडे धुवून सुकवत असताना तिचा पाय घसरला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलेला वाचवण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत 10 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर महिलेचा जीव वाचवल्याबद्दल अग्निशमन दलाच्या जवानांचेही लोकं कौतुक करत आहेत.

व्हिडीओ पाहून एका युजरने 'सॅल्यूट टू द रेस्क्यूर्स' अशी कमेंट केली आहे, त्याचवेळी दुसऱ्या युजरने 'अग्निशमन दलाचे अद्भुत काम' असे लिहिले आहे. एका वापरकर्त्याने 'ती (महिला) 18व्या मजल्यावर (कपड्यांमुळे) वाचली' अशी देखील कमेंट केली आहे.