फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, हवामान बदलाची लढाई आपण हरतोय...

जागतिक नेत्यांनी हवामान बदलावर ठोस पावलं लगेच उचलण्याचं आवाहन इम्यनुअल मॅक्रॉन यांनी केलंय.

Updated: Dec 14, 2017, 08:16 PM IST
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, हवामान बदलाची लढाई आपण हरतोय... title=

नवी दिल्ली : जागतिक नेत्यांनी हवामान बदलावर ठोस पावलं लगेच उचलण्याचं आवाहन इम्यनुअल मॅक्रॉन यांनी केलंय.

पॅरिस करार

सगळ्या देशांनी सह्या केलेल्या पॅरिस करारानुसार औद्योगिकरणाच्या आधी जे तापमान होते त्याच्यावर १.५ डिग्री सेल्सिअस तापमान राखण्याचे ठरले आहे. यासाठी हरित वायूंच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

आपण गाफील आहोत

पॅरिसमध्ये झालेल्या हवामान बदल विषयक परिषदेला दोन वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने बोलताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यनुअल मॅक्रॉन म्हणाले की हवामान बदलाची लढाई आपण हरतो आहोत, आपण गाफील राहण्याची चूक करता कामा नये. 

ठोस पावलं उचलावीत

आपण ठोस पावलं उचलत आपल्या देशांमध्ये, समाजांमध्ये, आपल्या अर्थव्यवस्थांमध्ये आणि स्वत:मध्ये बदल घडवत आपल्या आणि आपल्या ग्रहाच्या भवितव्याची निवड केली पाहिजे, असंही इम्यनुअल मॅक्रॉन म्हणाले. दरम्यान युरोपियन युनियनने या संदर्भात १० कलमी कार्यक्रमाची आखणी केली आहे.