Yap Island:'या' ठिकाणी पैसेच वापरत नाही लोक; 'सर्वात श्रीमंत कोण?'ची व्याख्या फारच अजब

Yap Island: जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे अनेक परंपरा वर्षानूवर्षे सुरू आहेत. आपल्याला जर का कुठलीही वस्तू विकत घ्यायची असेल तर त्याबदल्यात आपण पैसे देतो आणि विकत घेतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्याकडे चलन व्यवस्था आहे.

Updated: Jan 26, 2023, 04:53 PM IST
Yap Island:'या' ठिकाणी पैसेच वापरत नाही लोक; 'सर्वात श्रीमंत कोण?'ची व्याख्या फारच अजब title=

Yap Island: जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे अनेक परंपरा वर्षानूवर्षे सुरू आहेत. आपल्याला जर का कुठलीही वस्तू विकत घ्यायची असेल तर त्याबदल्यात आपण पैसे देतो आणि विकत घेतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्याकडे चलन व्यवस्था आहे. मिडियम ऑफ एक्सचेंज (Medium of Exchange) म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. एका देशातून आपण दुसऱ्या देशातील चलनाची देवाणघेवाण करतो. करन्सीसाठी (Currency) आपण नोटा आणि नाणी वापरतो. परंतु अशा एका ठिकाणी मात्र करन्सी म्हणून चक्क दगड वापरला जातो आणि आजही ही सिस्टिम येथे सुरू आहे. हो, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल परंतु हे खरं आहे. तेव्हा जाणून घेऊया हा देश नक्की आहे तरी कुठे आणि नक्की ही परंपरा येथे कशी सुरू झाली. (world viral news yap island where stone is used as their currency know more about the island)

जेव्हा नाणी आणि नोटांचा शोध लागला नव्हता तेव्हा मात्र लोकं दगडांचा वापर करायचे. त्यानंतर जेव्हा माणूस अधिक प्रगल्भ होत गेला त्याप्रकारे चलनाची पद्धतही बदलली गेली. परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानात (Science and Technology) इतकी प्रगती झाल्यावरही जगाच्या पाठीवर असं कोणतं ठिकाणं आहे जिथे आजही येथे करन्सी म्हणून दगडं वापरले जातात. याचे कुतूहल तुम्हालाही लागून राहिले असेल. 

पुर्वी बार्टर सिस्टिम (Barter System) होती जेव्हा वस्तूंची देवाणघेवाण केली जायची. त्यात समजा जर का तुम्हाला एक गोष्ट विकत घ्यायची असेल तर तुम्हाला त्याच्या बदल्यात त्या विक्रेत्याला त्याच वस्तूच्या तोडीस तोड वस्तू द्यावी लागते. यालाच बार्टर सिस्टिम असं म्हणतात. म्हणजेच जर का तुम्ही पेन दिलेत तर त्याच्या बदल्यात पेन्सिल नाहीतर त्याप्रकारचे काहीतरी वस्तू देणे महत्त्वाचे आहे. त्यातच योग्य बॅलेन्स (Balance of Payment) होतो. परंतु नक्की ही सिस्टिम किचकट झाल्याने मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून नोटा आणि नाणी आलेत. त्यानंतर आपण कुठेलीही वस्तू खरेदी करताना त्यासाठी योग्य ती किंमत मोजतो. 

आपण ज्या ठिकाणाबद्दल बोलतोय त्याचे नावं आहे यप आयलॅंड (Yap Island). हे पिसिफिक ओशनमध्ये म्हणजे प्रशांत महासागरात आहे. या ठिकाणी फक्त 12 हजार लोकं राहतात. हे आयलॅंड फक्त 100 स्केवर किलोमीटरनं पसरलेलं आहे. या ठिकाणी छोटी छोटी गावंही आहेत. परंतु येथे नोटा किंवा नाण्यांपेक्षा दगड वापरले जातात. 

काय आहे चलन पद्धत? 

येथे प्रत्येक कुटुंबियांकडे एक दगड असतो. ज्याच्यामध्ये एक भोक असतो. त्याचबरोबर कुटुंबियांचे आडनावंही येथील दगडांवर लिहिले असते. ज्यांच्याकडे जास्त मोठे दगड ते सर्वात जास्त श्रीमंत अशी येथील श्रीमंतांची व्याख्या आहे. जितका दगड जास्त वजनाचा तशी त्या दगडाची किंमत ठरवली जाते.