एका ट्टवीटमुळे त्याला असंख्य मुलींची पसंती, आलीय लग्नाची ऑफर

त्याच्या घराच्या भिंती पुस्तकांनी भरल्या आहेत. 

Updated: Aug 10, 2020, 09:10 AM IST
एका ट्टवीटमुळे त्याला असंख्य मुलींची पसंती, आलीय लग्नाची ऑफर

नवी दिल्ली : एका अनोख्या ट्वीटमुळे खूपजण प्रसिद्ध झाल्याचे आपण पाहीले आहे. असाच काहीसा प्रकार सध्या ट्वीटरवर पाहायला मिळतोय एका तरुणाच्या फोटो ट्वीटमुळे त्याचे असंख्य चाहते बनलेयत. अनेक तरुणी त्याला मैत्रीसाठी, शेजारी राहायला येवू का अशी विचारणा करत आहेत. त्यात एका तरुणीने तर चक्क त्याला लग्नाचीच ऑफर केलीय. 

शौमिक या तरुणाने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन घरातील पुस्तकांच्या कपाटाचा फोटो ट्वीट केला. त्याच्या घराच्या भिंती पुस्तकांनी भरल्या आहेत. ज्यांना माहीत नाही मी लायब्ररीत राहतो असे कॅप्शन त्याने या ट्वीटला दिले. 

शौमिककडील प्रचंड पुस्तकांच्या कलेक्शनचे ट्वीटर युजरकडून कौतूक व्हायला लागले.

अनेकांनी हे ट्वीट रिट्वीट करायला सुरुवात केली. त्यामुळे काही वेळातच या ट्वीटला ८ हजारांहून अधिक लाईक्स मिळायला सुरुवात झाली.

आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्सचा पाऊस पडायला लागला.

मला तुझा रुम पार्टनर व्हायचय असं काहींनी म्हटलंय. 

तर मला तुझ्या शेजारी राहायला आवडेल अशी इच्छा देखील काहींनी व्यक्त केली. एकीने तर मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल असे म्हणत थेट लग्नाचीच ऑफर देऊन टाकली.

त्यामुळे आपल्या पुस्तक प्रेमामुळे शौमिक सध्या सेलिब्रिटी झालायं.