मुंबई : अभिनेता सलमान खानला बॉलीवूडचा सुल्तान असंच म्हटलं जात नाही. कारण सलमान खान सलग तिसऱ्या वेळा फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 सेलिब्रिटी लिस्ट 2018 मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 1 ऑक्टोबर 2017 पासून, तर 2018 पर्यत सलमान खानचे चित्रपट, टीव्ही आणि ब्रँड एंडोसर्मेंटमध्ये त्याचं वार्षिक उत्पन्न पूर्ण मिळून 253.25 कोटी इतकी कमाई झाली आहे. ज्यामुळे फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटीच्या लिस्टमध्ये सलग तिसऱ्यांदा सलमान सुल्तान बनला आहे.
सलमान खानच्या चित्रपटाने टाइगर जिंदा है', 'रेस 3' आणि टीव्ही रिएलिटी शो 'बिग बॉस' और 'दस का दम' आणि जाहिराती मिळून इतकी कमाई केली आहे. दुसऱ्या नंबरवर भारतीय क्रिकेट कॅप्टन विराट कोहली या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानवर आहे. तर अक्षय कुमार तिसऱ्या क्रमांकावर आहे.
इंडीयन क्रिकेट कॅप्टन विराट कोहलीने 228.9 कोटीची कमाई करून या लिस्टमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. तर अक्षय कुमारने 185 कोटी कमाई करून, तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 सेलिब्रिटीची पूर्ण कमाई 3140.25 कोटी इतकी आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी 17 टक्क्यांनी जास्त आहे. मागील वर्षाची कमाई एकूण 2 हजार 683 कोटी इतकी होती.
बॉलीवूडचा किंग खान, शाहरुख मागील वर्षी या लिस्टमध्ये 170.5 कोटीच्या कमाईसह दुसऱ्या क्रमांकावर होता. जेव्हा की यावर्षी टॉप दहाच्या लिस्टमधून तो बाहेर आहे. या वर्षी शाहरुख खानचा एकही चित्रपट पडद्यावर झळकला नाही. त्यामुळे शाहरुख 56 कोटींच्या कमाईसह तेराव्या स्थानावर आहे.
अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न करून बॉलीवूड अॅक्ट्रेस प्रियंका चोप्रा मागील वर्षी 68 कोटी रुपये कमाई करून, सातव्या स्थानवरून ४९ व्या क्रमांकावर आहे. कारण या वर्षी प्रियंका फक्त 18 कोटीची कमाई करू शकली. तर बाजीराव मस्तानीमध्ये काम करणारी दीपिका पादुकोनने प्रियंकाला पछाडले आहे.
या वर्षीच्या सुरूवातीला आलेल्या 'पद्मावत' चित्रपटामुळे दीपिकाचा फायदा झाला आहे. 2018 मध्ये दीपिकाने 112.8 कमाई केली. तिला टॉप पाचमध्ये जागा मिळाली आहे. यावेळी दीपिका चौथ्या क्रमांकावर आहे, असं 2012 नंतर झाले आहे. फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 सेलिब्रिटी लिस्टमध्ये मागील वर्षी 21 महिला होत्या. जेव्हा की या वर्षीच्या लिस्टमध्ये 18 महिलाचा समावेश होत आहे.