Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा असतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात. अशात ते पंढरपूरी जात असताना अभंग गातात, फुगड्या खेळतात आणि त्यासोबतच डान्स करताना दिसतात. या वारीत येणाऱ्या लोकांची वयाची काही सीमा नसते. अनेक तरुणही या वारीत सहभागी होतात तर दुसरीकडे म्हातारो आजी-आजोबा आपल्याला या वारीत दिसतात. अशाच एक तरुण आजी आहेत. ज्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत या आजी वारीत जाताना कशी मज्जा करतात ते जाणून घेऊया...
या आजी 90 वर्षांच्या असून त्यांचं नाव सुभद्राबाई भोसले असं त्या आजींच नाव आहे. त्या आजी पुण्याच्या आहेत. त्या 90 वर्षांच्या आजींचा उत्साह हा कोणालाही उत्साह आणेल हे मात्र, खरं आहे. वारीत आल्यावरच आपल्याला हे सगळं आनंदानं पाहायला मिळतं. तर त्या 25 वर्षांपासून वारीला येत आहेत ते देखील न थांबता. वारीत आल्यावर कसं वाटतं असा प्रश्न विचारता त्या आजी म्हणाल्या, "आनंद होतो. नाचायची इच्छा होते. अभंग म्हणायची इच्छा होते. गवळणी म्हणायची इच्छा होते. खूप जास्त आनंद होतो. देव माझा माझा गं बाई... मी देवाची असं म्हणतं त्यांनी वारीला येण्याचा त्यांचा आनंद व्यक्त केला आहे."
हेही वाचा : Ashadhi Ekadashi 2023 : भक्तांचा जनसागर! निवृत्ती महाराजांची पालखी थाटामाट पंढरपूरच्या दिशेनं रवाना
पुढे 90 वर्षांच्या आजी या जेव्हा दिंडीला जातात तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांना काय वाटतं याविषयी बोलताना आजी म्हणाल्या, "त्यांना असं वाटतं की या आजी 90 वर्षांच्या आहेत. यांची किती सेवा करायला पाहिजे. इतक्या मोठ्या असूनही त्या नाचतात, अभंग म्हणतात, गवळणी म्हणतात आणि या दिंडीत चालत जातात."
फुगडी खेळू देण्यावर विचारताच त्या म्हणाल्या "मला फुगडी खेळू देतात पण माझी जितकी इच्छा आहे तितका वेळ नाही... तर ते म्हणतात की थोडा वेळच खेळा कारण तुमचं वय झालं आहे. तर त्यानुसार तुम्ही कमी वेळ फुगडी खेळायला हवी."
या आजी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असे काही बोलून गेल्या की सगळ्यांना शहारे आले. त्यासोबत त्यांनी आताच्या तरुणांना आपले मावळे किती शुरवीर होते हे सांगत आताची मुलं कशी संस्कार नसल्यासारखी मद्यपान करतात आणि वावरतात हे सांगत टोला लगावला आहे. या आजींचा हा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा वारी सुरु होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.