भारताचा जगाला अंचबित करणारा प्रयोग! SPADEX मिशन लाँच; ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार

SPADEX  Mission : 2024 या वर्षाच्या शेवटी भारताने जगाला अचंबित करणारा प्रयोग केला आहे. या प्रयोगा अंतर्गत डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे दोन पार्ट जोडले जाणार आहेत.   

वनिता कांबळे | Updated: Dec 30, 2024, 10:44 PM IST
भारताचा जगाला अंचबित करणारा प्रयोग! SPADEX मिशन लाँच; ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार title=

SPADEX Space Docking Experiment : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO जगातील सर्वात मोठा प्रयोग केला आहे.  ISRO ने SPADEX (Space Docking Experiment) मिशन लाँच केले आहे.या मोहिमेत  ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार आहे. भारतीय तंत्रज्ञान पाहून जग अवाक झाले आहे. SPADEX  मिशन हे चांद्रयान 4 मोहिमेतील महत्वाचा टप्पा आहे. 

चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर आता इस्रोच्या टीमने आता मिशन चांद्रयान 4 ची तयारी सुरु केली आहे. चांद्रयान 3 पेक्षा चांद्रयान 4 ही मोहिम अत्यंत वेगळी असणार आहे. चांद्रयान 4  स्पेसक्राफ्टचे पार्ट हे थेट आकाशात जोडले जाणार आहेत. भारताची नवी टेन्कॉलीजी पाहून संपूर्ण जग अचंबित झाले आहे. 

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून स्पॅडेक्स मोहिमेचं यशस्वीरित्या प्रक्षेपण झाल आहे. भारताचं हे यशस्वी प्रक्षेपण म्हणजे अंतराळातील एक मैलाचा दगड मानलं जात आहे. भारताच्या स्पॅडेक्स मोहिमेंतर्गत PSLV-C60  रॉकेटद्वारे दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. या दोन उपग्रहांचे मिळून एकूण वजन सुमारे 220 किलो आहे. यापैकी एक चेझर आणि एक लक्ष्य असेल.  जानेवारी 2025 मध्ये अंतराळात डॉकिंग – अनडॉकिंग केले जाणार आबहे. हा प्रयोग पृथ्वीपासून 470 किमी अंतरावर होईल. प्रयोगानंतर दोन्ही उपग्रह पृथ्वीभोवती दोन वर्षे फिरतील. 

चांद्रयान 4 चे स्पेसक्राफ्टचे पार्ट हे आकाशात किंवा लँडिगवेळी चंद्रावरच एकमेकांना जोडले जातील. जगात प्रथमच मून मिशनसाठी अशा प्रकारच्या तंत्रज्ञाचा वापर केला जात आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरणारा भारत हा पहिला देश आहे.
 टार्गेट आणि चेसरचा वेग ताशी 28 हजार 800 किलोमीटर असेल. लॉन्च झाल्यानंतर सुमारे 10 दिवसांनी डॉकिंग प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे टार्गेट आणि चेजर एकमेकांशी जोडले जातील. चेझर स्पेसक्राफ्ट सुमारे 20 किलोमीटर अंतरावरून लक्ष्य अंतराळ यानाकडे जाईल. यानंतर, हे अंतर 5 किलोमीटर, नंतर दीड किलोमीटरपर्यंत कमी होईल, त्यानंतर ते 500 मीटर होईल.

जेव्हा चेझर आणि लक्ष्य यांच्यातील अंतर 3 मीटर असेल तेव्हा डॉकिंगची म्हणजेच दोन अंतराळयानांना जोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. चेझर आणि टार्गेट जोडल्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर हस्तांतरित केली जाईल. ही संपूर्ण मिशन पृथ्वीवरूनच कंट्रोल केले जाणार आहे. ही मोहीम इस्रोसाठी एक मोठा प्रयोग आहे, कारण भविष्यातील  अनेक अंतराळ मोहिमा या मिशनवर अवलंबून आहेत.

डॉकिंग-अनडॉकिंग तंत्र चांद्रयान-4 मिशनमध्ये वापरले जाणार आहे. म्हणजेच चांद्रयान-4 मोहिमेचे यश स्पेसएक्सच्या यशावर अवलंबून आहे. या मोहिमेचे तंत्रज्ञान नासाप्रमाणे स्वतःचे स्पेस स्टेशन तयार करण्यासाठी देखील वापरले जाणार आहे. याशिवाय सॅटेलाइट सर्व्हिसिंग, आंतरग्रहीय मोहिमा आणि चंद्रावर मानव पाठवण्यासाठीही हे तंत्रज्ञान दिशादर्शक ठरणार आहे.