नरेंद्र मोदींचं मिशन, पाटण्यामध्ये सांत्वन

पाटणा येथे झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची नरेंद्र मोदींनी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच भाजपच्या वतीने त्यांनी मृतांच्या वारसास पाच लाखांचा चेकही दिला.

ओबीसी संघटनांचं बँडबाजा आंदोलन

यवतमाळात सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या घरासमोर विविध ओबीसी संघटनांतर्फे बँडबाजा आंदोलन करण्यात आलं. यावेळी राणा प्रताप नगर येथील मोघे यांच्या बंगल्यासमोर बॅन्ड वाजवून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दिवाळीत जालना पालिकेच्या नियोजनाची दिवाळखोरी!

जालना पालिकेच्या नियोजनाची दिवाळ-खोरी पुढे आली आहे. पथदिव्याचं 14 कोटींचं वीजबिल न भरल्यानं गेल्या ९ महिन्यांपासून लोकांचा प्रवास अंधारातच सुरु आहे. नागरिकांनी पालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून पालिका बरखास्त करण्याची मागणीही केलीय.

स्वातंत्र्यांनंतर प्रथमच 'त्यांची' दिवाळी!

मुंबईतल्या आदिवास्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज कनेक्शन मिळालयं. दिवाळीच्या दिवशी वीज आल्यानं आदिवासींनी दिपोत्सवाचा खरा आनंद साजरा केलाय.

भिंत (कथा)

उध्वस्त गावाच्या भग्न घरांच्या रांगेतून, जरा पुढे, त्याच त्या कोपऱ्यात ‘ती’ भिंत विषण्णपणे उभी आहे. उन्हा-पावसात कणा कणाने ढासळत आहे... निसर्ग नियमानुसार...

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं पितळ उघड!

‘दहशतवाद पुरस्कृत देश’ म्हणून घोषित करण्याचा अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतरही पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मे 1992मध्ये ‘आयएसआय` या पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याला काश्मीरमधील आपल्या छुप्या कारवाया सुरूच ठेवण्यास सांगितलं होतं.

प्रियकराच्या मदतीने आईनेच केली मुलीची हत्या

केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या चार वर्षांच्या लहानग्या मुलीची हत्या केली. आईनेच आपल्या पोटच्या पोरीचा गळा दाबून खून केला.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुर्णत्वाचा दाखलाच नाही

पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धघाटन होणार आहे. मात्र उद्धाघटन होत असलेल्या हॉस्पिटलच्या इमारतीला महापालिकेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुंबईकरांनो सावधान...

वाहतुकीचे नियम मोडणा-या मुंबईकरांनो सावधान... आता नुसताच दंड भरुन सुटका नाही

मंगळवेढ्यात वडाच्या पानांमध्ये सोन्याचा अंश

सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यात भूगर्भशास्त्रज्ञांनी वडाच्या झाडाच्या पानात सोन्याचा अंश असल्याचा शोध लावलाय. या भागातल्या जमिनीत सोन्याच्या कणांचा अंश असल्याने ते झाडांच्या पानात उतरत असल्याचे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय.