राज आणि उद्धव यांचं अनोखं `बंधुप्रेम`!
राज-उद्धवमध्ये सीझ फायर ? ... गेल्या काही महिन्यांत दोघांची एकमेकांवर टीका नाही... निवडणुकीआधी काय शिजतंय शिवसेना- मनसेत ?... सेना-मनसेत तयार होतोय "अंडरस्टँडिंग" फॉर्म्युला ?...
आसाराम बापूंचा विरार आश्रम तोडण्यास सुरूवात
विरारमध्ये आसाराम बापूंचा आश्रम तोडण्यास सुरुवात करण्यात आलीय.. तहसीलदारांनी आश्रम अनधिकृत असल्यामुळे कारवाईचे आदेश दिले आहेत. कुंभारपाडामध्ये हा आश्रम आहे.
भक्ताच्या नववधूसोबत भोंदूबाबा फरार!
नाशिकच्या देवळा पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे एका भक्ताचं लग्न जमत नसताना त्याने भक्ताचं लग्न नोंदणीपद्धतीने लावून दिलं आणि नववधूला घेऊन बाबा फरार झालाय.
`क्रिश ३`ने मोडला `टायगर` आणि `चेन्नई`चा रेकॉर्ड!
हृतिक रोशनच्या ‘क्रिश ३’ ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला आहे. १ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या `क्रिश ३` ने पहिल्या ४ दिवसांतच विक्रमी कमाई करून १०० कोटी क्लबमध्ये एंट्री मिळवली आहे.
मुलुंडमध्ये खासगी रुग्णालयाला आग, डॉक्टरचा मृत्यू
मुलुंडमध्ये गोकुळ नावाच्या खाजगी रुग्णालयाला आग लागली होती. या आगीत एका डॉक्टरचा होरपळून मृत्यू झालाय. राहुल रुद्रवार असं मृत डॉक्टरचं नाव आहे.
दिवाळीत मिशेल ओबामांचा बॉलिवूड डान्स
यंदा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांच्या पुढाकाराने व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी जल्लोषात साजरी झाली. या वेळी मिशेल ओबामा यांनी बॉलिवूडच्या गाण्यांवर नृत्यही केलं.
निवडणुकीत हरल्यानंतर मोदींचं भविष्य शून्य!- रमेश
एका परदेशी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींवर टीकेची तोफ डागली आहे. मोदी हुकुमशाह असल्याचं म्हणत रमेश यांनी मोदींची निवडणुकीनंतर दुर्गती होणार असल्याचं भाकित केलं आहे.
नाशिकच्या एटीएममध्ये भलत्याच नोटा!
ऐन दिवाळीत एटीएममधले पैसे संपल्याच्या अनेक घटना आजपर्यंत समोर आल्यात. पण नाशिकमध्ये वेगळीच घटना घडलीय. एटीएममधून चलनातून बाद झलेल्या ५०० रुपयांच्या नोटा मिळाल्याची नागरिकांची तक्रार आहे.
चंद्रपूरची मानसी पटकावणार मिस युनिव्हर्सचा ताज?
मानसी मोघे ही चंद्रपूरची कन्या थेट मिस युनिव्हर्स स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करतेय. २१ वर्षांची मानसी सध्या मॉस्कोमध्ये होत असलेल्या स्पर्धेसाठी रशियात पोहोचलीये.
कांद्यापाठोपाठ टोमॅटो बटाट्याचे भाव कडाडले
कांद्यापाठेपाठ आता टोमॅटो आणि बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाट्याच्या किंमतीही किलोमागे १० ते १५ रूपयांनी वाढल्या असून, त्यामुळे सामान्यांच्या किचनचे बजेटच कोलमडून जाणार आहे.