अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ मुं शिंदे यांची निवड

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ मुं शिंदे यांची निवड झालीये. या निवडणुकीत एकूण ९०४ मतं पडली. यातली १४ मतं अवैध ठरली. फ मुं शिंदे यांना ४६० मतं मिळाली.

<b>स्कोअरकार्ड : कांगारूंना धू-धू धुतले</b>

स्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया दुसरी वन डे

पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं- माजी कोळसा मंत्री

कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी कोळसा सचिव पी. सी. पारीखनं सरळसरळ पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. खाण वाटपामध्ये घोटाळा झाला असल्याचं सीबीआयला वाटत असल्यास पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं कारण खाण वाटपाशी संबंधित कागदपत्रांवर पंतप्रधानांनीच स्वाक्षरी केलीय अशी मागणी पी. सी. पारीख यांनी केलीय.

छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या

छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला तळेगाव दाभाडे इथे मंगळवारी हा प्रकार घडलाय.

मकरंद अनासपुरे, सुबोध भावे आणि संजय नार्वेकरची फसवणूक

निर्मात्यांनी फसवणूक केल्याची तक्रार अभिनेता मकरंद अनासपूरे, सुबोध भावे आणि संजय नार्वेकर यांनी निर्माता संजय चौधरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

सिद्धार्थ कॉलेजचा गोंधळ... एक कॉलेज दोन प्राचार्य

गेल्या काही वर्षांपासून कायम वादाच्या भोव-यात असलेल्या फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेजमध्ये आणखी एक घोळ समोर आला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये एकच प्राचार्य असतो.. परंतु इथं मात्र दोन प्राचार्य बसतात. त्यापैकी असली कोणता आणि नकली कोणता, हे कुणालाच सांगता येणार नाही.

पैसे खाणाऱ्या महिला पोलिसाची दबंगगिरी!

‘सद् रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद उराशी बाळगत पोलीस जनतेची सेवा करतात.. मात्र पिंपरीत एक महिला पोलीसानं खाकीला डाग लागावं असं वर्तन केलंय...

अज्ञात व्यक्तींकडून टोल कर्मचाऱ्यावर गोळीबार

अज्ञात व्यक्तींनी टोल कर्मचा-यावर गोळीबार केल्याची घटना खेड-शिवापूर टोल नाक्यावर घडली आहे. मंगळवारी रात्री घटना घडली.

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याची हत्या

नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यातील आपापसातील वैमनस्यातून दोन जाणावर हल्ला झालाय. यात एका कैद्याचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर आहे.