२१ वर्षांनी येतोय `खिलाडी`चा सिक्वल

१९९२ साली आलेला ‘खिलाडी’ सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. या सिनेमाने अक्षय कुमारला स्टार बनवलं. थ्रिलर असणाऱ्या या सिनेमातील गाणी चांगलीच गाजली होती. आता २१ वर्षांनी या सिनेमाचा पुढचा भाग येत आहे.

डेंग्यू मुंबईच्या मानगुटीवर, विद्यार्थी विनाकारण रस्त्यावर!

मुंबईत डेंग्युचं थैमान सुरू आहे. मुंबईत डेंग्युचे रूग्ण वाढत आहे.पाचजणाचा डेंग्यु बळी गेल्याचं मुंबई महापालिकेचा अहवाल सांगत आहे. या डेंग्युला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने शाळेच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थांना रस्त्यावर उतरवलं आहे.

यंदा TYच्या परीक्षा उशिरा?

60-40 या मार्कसच्या क्रेडिट सिस्टिममुळे यंदा मुंबई विद्यापीठाच्या तिस-या वर्षाच्या परीक्षा उशीरा होण्याची शक्यता आहे, असं असतानाही या शैक्षणिक वर्षात हाच फॉर्मुला कायम राहिल असं विद्यापीठानं म्हटलंय.

एक रुपयांत शेतकऱ्यांना पोटभर जेवण!

एक रुपयांत शेतक-याना पोटभर जेवण... हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल... खामगावची कृषी उत्पन्न बाजार समितीने हे करुन दाखवलंय..

गेस्ट ब्लॉग :`सेट` युवर करिअर!

सेट डिझायनिंग हे करिअर म्हणून खरोखरच आकर्षक, कष्टाचं पण पैसा आणि नाव मिळवून देणारं आहे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे समाधान देणारं आहे.

`भगतसिंगांच्या चरित्राचं प्रकाशन मोदींच्या हस्ते होऊ देणार नाही!`

क्रांतिकारक भगतसिंग यांचं चरित्र प्रकाशित होत असून या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, पुस्तकाच्या लेखकाने आणि प्रकाशकांसह काही नागरिकांनी या गोष्टीला विरोध दर्शवला आहे.

`रामलीला`मध्ये प्रियांका चोप्राचं आयटम साँग

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने बबली बदमाश,पैसेवाल्यांची पिंकी बनून आयटम साँग केलं होतं...आता पुन्हा एकदा ती रामलीला सिनेमात आयटम साँगसाठी रुपेरी प़डद्यावर आपले जलवे दाखवण्यासाठी थिरकणार आहे....

२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!

आत्ताच योग्य ती पावलं न उचलल्यास २०३० सालापर्यंत लोकसंख्येला पुरेसं पाणी पृथ्वीतलावर शिल्लक राहाणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिला आहे. २०३० सालापासून फार मोठं जलसंकट उभं राहाणार आहे.

सचिनची `फेअरवेल` मॅच वानखेडेवरच...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 200 वी टेस्ट मुंबईत खेळवण्यावर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केलं... आणि सचिनची आई रजनी तेंडुलकरचं वानखेडेवर मुलाला खेळताना पाहण्याचं स्वप्न साकार झालं...

मुंबईतल्या घरांसाठी बिल्डर्सकडून ‘दिवाळी ऑफर्स’!

मुंबईमध्ये घर विकत घ्यायचा विचार करत असाल तर निदान एकदा तरी बिल्डर्सच्या वेगवेगळ्या ऑफर्स नक्कीच बघा. मुंबईत डेव्हलप झालेल्या पण न विकलेल्या घरांच्या वाढत्या संख्येबरोबरच ग्रहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काऊंट्स आणि ऑफर दिल्या जात आहेत.