डिअर जिंदगी : पती, पत्‍नी आणि घरकाम!

दोन्ही एकाच प्रोफेशनमध्ये आहेत. एक सारख्या स्थितीचा सामना करतात. तरी देखील घरातील सर्वकामं महिला सदस्यांनी करावीत असं न सांगता ठरलेलं असतं. घर

जयवंत पाटील | Updated: Feb 14, 2019, 05:47 PM IST
डिअर जिंदगी : पती, पत्‍नी आणि घरकाम!

दयाशंकर मिश्र : घरातलं काम किती सोपं, किती कठीण. यावर जेवढे वादविवाद होवू शकतात, त्यापेक्षाही तीन पट अधिक लिहीलं जावू शकतं. जेवढं लिहीलं जावू शकतं, त्याच्या तीन पट अधिक मनात ते 'घर' करत राहतं. जीवनाला तणाव, राग आणि नैराश्य वादविवादाकडे घेऊन जात नाहीत, मतभेद देखील घेऊन जात नाहीत. तर, प्रचंड निराशा, सर्वाधिक नात्यांमधील ताणतणाव आणि मनातील न सुटणारे प्रश्न मात्र घेऊन जातात.

मनातील न सुटणारे, सतत सतावणारे प्रश्न, उत्तरापर्यंत पोहचत नाहीत, तर आपल्या धमन्यांमधील धावणाऱ्या रक्त कणिंकांसोबत मिळून जीवन ऊर्जा शोषण्याचं काम करतात.

'डिअर जिंदगी'चे आतापर्यंत ४०० सदर झाली. आतापर्यंत मिळणारे सल्ले, आग्रह, संवाद यांच्या आधाराने आपण प्रश्नांकडे पाहिलं, तर घरातलं काम नेहमी दाम्पत्यातील मनभेदाचं कारण असतं.

पतीला असं वाटतं की, मी ऑफिसला गेल्यानंतर पत्नीला कोणतंही काम नसतं. मुलं स्वत:चं स्वत: पाहतात. एका वयानंतर मुलांना जास्त काही सांभाळावं लागत नाही. बायकोकडे खूप वेळ असतो. ज्याचा उपयोग टेलिव्हिजन, झोप आणि गप्पा हाकण्यासाठी गेला जातोय. मोठ्या संख्येत पुरूषांना देखील असं वाटतं की,  दिवसभर तमाम प्रश्न सोडवण्यात ते व्यस्त असतात. ते खूप काही मानसिक आणि शारीरिक श्रम करतात.

हे तर अशा दाम्पत्याबद्दल झालं, त्यांच्यातील एक व्यक्ती कुणीतरी कामावर असते. पण आता अशा नवऱ्या-बायकोचे प्रश्न आहेत. ज्यात दोन्ही कामावर जातात.

दोन्ही एकाच प्रोफेशनमध्ये आहेत. एक सारख्या स्थितीचा सामना करतात. तरी देखील घरातील सर्वकामं महिला सदस्यांनी करावीत असं न सांगता ठरलेलं असतं. घर सांभाळण्याचं काम महिलांचंच असतं, असं ठरल्यात जमा असतं.

घर सांभाळणं महिलेचं काम हा आपला आधीपासून मूळ समज आहे. ज्यात घर आणि महिला हेच एकमेकांशी जोडलेले आहेत. या यादीत मानव विज्ञान, शरीर विज्ञानापासून, समाज निर्माणाची मोठी साखळी आहे. यात आदी-मानवापासून आधुनिक वेळेपर्यंतशी संबंधित मनोविज्ञान आहे.

काही महिन्यांपूर्वी रेल्वेच्या प्रवासात मला एक दाम्पत्य भेटलं. सुरूवातीला त्यांनी माझ्याशी मुलींचं शिक्षण, भविष्य, स्वातंत्र्य यावर मोकळेपणाने विचार मांडले. याच दरम्यान त्यांनी सांगितलं की, ते आपल्या मुलासाठी मुलगी म्हणजेच सूनबाईच्या शोधात आहेत, एक मुलगी पाहायला ते गेले होते. मुलगी सुशिक्षित होती, बँक मॅनेजर होती. मुलगा देखील बँकिंग सेक्टरमध्ये आहे. यासाठी ते मध्य प्रदेशच्या जबलपूरहून दिल्लीला मुलगी पाहण्यास आले होते.

त्यांनी सांगितलं, 'सर्व काही ठिक होतं, पण मुलीची अट होती, यामुळे पुढे काही बोलणी झाली नाही.'

मी सांगितलं, 'आधीपासून सांगा, नेमकं काय झालं?'

यावर ते दाम्पत्य सांगत होतं, 'आम्हाला सर्वकाही मान्य होतं, पण आमची एक इच्छा होती, घरात दुसऱ्या गोष्टींसाठी मदनीस असू शकतो, मात्र जेवण बनवण्याचं काम सुनबाईलाच करावं लागेल. मुलीने मात्र सरळ सांगून टाकलं की हे काही शक्य नाही. बँकेत मोठ्या पदावर असल्यामुळे, येण्याजाण्याची वेळ सतत बदलत असते. अशावेळी हे कसं शक्य आहे की, जेवण बनवण्यासाठी सूनबाईची वाट पाहायची. यासोबत ऑफिसमधून उशीरा घरी आल्यानंतर तिच्याकडून जेवण बनवण्याची अपेक्षा तर अजिबात ठेवता येणार नाही'.

आपल्या मुलासाठी मुलगी पाहायला गेलेल्या या दाम्पत्याचा परिचय असा आहे. पती हे सेवानिवृत्त प्राध्यापक, पत्नी अजूनही बँकेत कारकून म्हणून कार्यरत आहे. पती मात्र या गोष्टीवर आश्चर्य व्यक्त करतोय की, आयुष्यभर त्यांच्या पत्नीने आपल्याला रूचकर जेवण खाऊ घालत, आपलं कर्तव्य पूर्ण केलं, तर त्यांच्या भावी सूनबाईला हे करण्यात अडचण तरी काय आहे.

आपण कुठून कुठे पोहोचलो आहोत, बँक सरकारीहून खासगी होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. समाज, शिक्षण यात मुलींचा हिस्सा कुठून कुठपर्यंत पोहोचला आहे, पण ज्यांना आपण आपलं संरक्षक मानतो, त्यांच्या विचारात आणि व्यवहारात परिवर्तन झालेलं नाही.

या विचारांचा जेव्हा युवकांच्या स्वप्नाशी संघर्ष होतो, तेव्हा घरात तणाव, उदासपणा आणि न संपणारा वाद सुरू होतो, ज्यांचा कोणताही शेवट नसतो.

घर सर्वांचं आहे, आता हे म्हणून काम चालणार नाही. सोशल मीडिया आणि सर्वांसमोर गप्पा मारण्याचे दिवस आता गेले. निरोगी नातं आणि जास्तच जास्त काळ नातं टिकण्यासाठी, आता नव्या जमान्यातील नवरा-बायकोने घरातील जबाबदाऱ्या नव्याने वाटणे गरजेचं आहे.

घर दोघांचं आहे, हे मनात खोलपर्यंत उतरवल्याशिवाय दुसऱ्या गोष्टीचं मोल नाही. नातं आणि घर यांचा नवा अर्थ बदलला आहे, तो बदल स्वीकारण्याची गरज आहे, ही गरज त्यांच्यासाठी आहे, ज्यांच्यासाठी जीवन सर्वात अनमोल आहे.

ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com

पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा : https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)