close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बिनधास्त...मदमस्त...

तिची स्टाईल, तिची अदा, तिचा बदलेला अंदाज पाहूया...भेटूयात कान फिल्म फेस्टिव्हलचा रेडकार्पेट गाजविणाऱ्या दीपिका पदुकोणला...

Updated: May 21, 2019, 01:34 PM IST
बिनधास्त...मदमस्त...

प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : ती आहे बिंधास्त मदमस्त महाराणी, ती आहे सौदर्याची लावण्यखाणी, ती आहे बॉलिवूडची मस्तानी...तुम्ही ओळखलंच असेल मी कुणाविषयी बोलतीये...चला तर मग कान चित्रपट महोत्सवाच्या रेडकार्पेटवर सर्वाधिक लक्ष जिने वेधून घेतलं. तिची स्टाईल, तिची अदा, तिचा बदलेला अंदाज पाहूया...भेटूयात कान फिल्म फेस्टिव्हलचा रेडकार्पेट गाजविणाऱ्या दीपिका पदुकोणला...

बॉलीवूडची मस्तानी दीपिका पादूकोण...

कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेडकार्पेटवर बॉलीवूडची ही हसीना जेव्हा अवरतली..तेव्हा कॅमेऱ्यांचा एकच लखलखाट झाला..
जगभरातील कलाकारांसाठी कानचा रेडकार्पेट म्हणजे एक स्वप्न असतं..बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनादेखील या रेडकार्पेटवर झळकण्याची इच्छा असते..
मात्र सगळ्यांनाच हे जमतं असं नाही...कानचा हा रेडकार्पेट जणू दीपिकाचीच वाट पाहत होता..दीपिकाची एन्ट्री तिनं परिधान केलेला शुभ्र रंगाचा आकर्षक गाऊन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीपिकाचा आत्मविश्वास..

दीपिकाच्या चेहऱ्यावरील हे हावभाव बरचं काही सांगून जात होते..

ग्लोबल आयकॉनच्या यादीत समाविष्ट असलेली दीपिका आपण खऱ्या अर्थी गोबल स्टार असल्याचचं पाऊलो पाऊली दाखवून देतं होती..
दीपिकानं कान सोहळ्यादरम्यान परदेशी मासिकांसाठी ४ वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट देखील केलं..
कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेडकार्पेटवर झळकलेली तिची अदा, तिचा अंदाज हॉलीवूडच्या अभिनेत्रींच्या तोडीस तोड होता..

कानच्या रेडकार्पेटवर दीपिकाला दोनदा झळकण्याची संधी मिळाली..पहिल्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दीपिकानं चाहत्यांची मनं जिंकली, तर दुसऱ्या वेळी दीपिकानं पोपटी रंगाचा गाऊन परिधान केला होता..मात्र या गाऊनमध्ये स्वत:ला कॅरी करणं तसं अवघड होतं..मात्र दीपिकानं तितक्याचं सहजपणे आणि तितक्याचं आत्मविश्वासानं कानचा हा 

बहुचर्चित रेडकार्पेट गाजवला ...

दीपिकाच्या या लूकवर तिचे चाहते अक्षरश: फिदा झाले नाही तरचं नवलं...?
बॉलीवूडमधील अनेक कलाकारांकडूनही दीपिकावर कौतुकाचा वर्षाव झाला ..मात्र मस्तानीवर सर्वाधिक खुश असणारं एक नावं ते अर्थात दीपिकाचा लाईफ पार्टन रणवीर सिंग..
दीपिकाच्या प्रत्येक लूकवर रणवीरनं आपली प्रतिक्रिया व्यक्त करत तिचा उत्साह वाढवला..

एकूणच ७२व्या कान फिल्म फेस्टिव्हलमधील दीपिकाचा रेड कार्पेटवरचा हा जलवा तिच्या चाहत्यांच्या अनेक दिवस लक्षात राहिल असाचं आहे.