India Squad For England Test : इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांपैकी तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे मोठा धक्का बसला असला तरी बीसीसीआयने नव्या खेळाडूची संघात एन्ट्री केलीये. टीम इंडियाने चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्याकरीता आकाश दीपची निवड केली आहे. याबाबची अधिकृत माहिती बीसीसीआयने ट्विट्टर अकाऊंटवरुन दिली. दिग्ग्जांना डावलून टीम इंडियामध्ये एन्ट्री मिळवणारा आकाश दीप नेमका आहे तरी कोण?
फास्टर गोलंदाज आकाश दीपला भारतीय संघात सामील करुन घेण्यात आलं आहे. आकाश दीप हा मुळचा बिहारचा आहे. वय वर्ष 29 आकाश दीपने आयपीएलच्या रॉयल बंगळुरूमध्ये 6 विकेट्स घेत दमगार कामगिरी बजावली. आकाश हा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर टेस्ट मॅचच्या सरावामध्ये आकाशने गोलंदाजी करत 6 विकेट्स काढल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच आकाशने इंग्लंड लायन्सच्या तीन सामन्यात एकूण 13 विकेट्स काढल्या होत्या. त्याची दमदार खेळी पाहून बीसीसीआयने आकाशला इंग्लंड विरुद्धच्या पुढील सामन्यासांठी निवडले, असं सांगितलं जात आहे.
आकाशने बंगालकडून 2020 मध्ये रणजीमध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले. 2022 मध्ये एशियन्स गेममध्ये भारतीय संघातला खेळाडू शिवम मावीला गंभीर दुखापत झाल्याने संघातआकाश दीपची निवड करण्यात आली होती. टीम इंडियाच्या चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्याकरीता निवड झाल्याने पुढील सामने आकाशच्या पुढच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाचा 1-1असा विजय झाला आहे. उर्वरीत सामन्यांपैकी तिसरा कसोटी सामना हा राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीला रंगणार आहे. त्याबरोबर 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये चौथा कसोटी सामना रंगणार असून पाचवा कसोटी सामना 7 मार्चपासून धरमशाला येथे होणार आहे. होणाऱ्या पुढील टेस्ट मॅचसाठी आता टीम इंडियाने कंबर कसली आहे. आधीच्या दोन्ही सामन्यात दुखापत झालेले खेळाडू पुढच्या सामन्यात दमदार कमबॅक करताना दिसणार आहेत.
होणाऱ्या पुढील कसोटी सामन्यांकरीता विराट कोहली नसणार असल्याचे सांगितलं जात आहे. असं असलं तरी शुभमन गिल, रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, केएल राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, जसप्रीत बुमराह,आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, केएस भरत ही टीम पुढील कसोटी सामने खेळणार आहे.