Pakistan become No 1 ODI team : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्या खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत पाकिस्तानने अफगाणिस्तान क्लिन स्वीप दिला. अफगाणिस्तानने तिन्ही वनडे सामन्यात पाकिस्तानला कडवी झुंज दिली. मात्र, पाकिस्तानने ही मालिका 3-0 ने जिंकली. त्याचबरोबर पाकिस्तान आता वनडे क्रिकेटमधील नंबर 1 टीम झाली आहे. आगामी वर्ल्ड कपआधी (World Cup 2023) वनडे क्रिकेटमधील अव्वल स्थान पटकावल्याने पाकिस्तानी संघाने जल्लोष केला. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं पहायला मिळतंय.
आज आपण आपल्या मेहनतमुळे नंबर वन टीम झालोय. या प्रवासात आपण अनेक चढउतार पाहिले आहेत. आपल्या टीममधील बाँडिंगमुळे आपण इथपर्यंत पोहोचलोय. टीममधील प्रत्येक खेळाडूचं मन साफ आहे. त्याला जमलं तर मला का जमलं नाही? अशी इर्शा कोणाच्याही मनात नाही. आपण एकमेकांच्या यशात सामील होतो. ही चांगली गोष्ट आहे. त्याचा जल्लोष साजरा करूया, असं बाबर म्हणताच ड्रेसिंग रूममध्ये सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मात्र, चार दिवसानंतर आशिया कप आहे, हे कोणीही विसरू नका, असं बाबर म्हणताच ड्रेसिंग रूममध्ये शांतता पसरली. त्यामुळे पाकिस्तान संघाने टीम इंडियाची धास्ती घेतली आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
आशिया कपमध्ये आपल्याला या गतीने पुढं जायचं आहे. एक संघ म्हणून तुम्हाला हिच टीम मॅटर करते. कधी तुम्हाला बॉलिंग जिंकवेल, तर कधी तुम्हाला बॅटिंग जिंकवेल. माझं तुझं काही नसेल, आपली टीम म्हणून आपण सर्वजण खेळू. राखीव खेळाडूंनी देखील खूप साथ दिली. त्यांचेही आभार... आपण सर्वजण असेल खेळ राहू, अशी आशा देखील बाबर आझमने व्यक्त केली आहे.
Hear from skipper @babarazam258 and team director Mickey Arthur as they address the players after achieving the No.1 spot in ODIs #AFGvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/WjowvCDv0y
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 27, 2023
दरम्यान, बाबरचं भाषण झाल्यानंतर सर्वांनी मिळून केक देखील कापला. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 2 सप्टेंबर रोजी सामना खेळवला जाईल. दोन्ही देशातील हा सामना श्रीलंकेत खेळवला जाईल. त्यासाठी आता दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.