प्रजासत्ताक दिनी टीम इंडियाचे गिफ्ट, न्यूझीलंडला ७ विकेट्सने धूळ चारली

टीम इंडीयाने दिले प्रजासत्ताक दिनाचे गिफ्ट

Updated: Jan 26, 2020, 04:58 PM IST
प्रजासत्ताक दिनी टीम इंडियाचे गिफ्ट, न्यूझीलंडला ७ विकेट्सने धूळ चारली  title=

ऑकलॅंड : टीम इंडियाने न्युझीलंडविरुद्ध टी २० सामन्यात ऐतिहासिक खेळ करत दुसरा टी २० सामना जिंकला आहे. न्यूझीलंडच्या विरुद्ध नुकत्याच झालेल्या सामन्यात टीम इंडीयाने प्रजासत्ताक दिनाचे गिफ्ट दिले. ७ विकेटने हरवत टीम इंडीयाने न्यूझीलंडला धूळ चारली. न्यूझीलंडसोबतचा हा सलग दुसरा विजय आहे. या सोबतच टीम इंडीयाने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. टीम इंडीयाने पहिली मॅच सहा विकेट्सनी जिंकली होती. आता दोन्ही संघांमध्ये २९ जानेवारीला पुढचा सामना खेळवला जाणार आहे. 

ऑकलॅंड येथे टीम इंडीया विरुद्ध न्यूझीलंड हा दुसरा टी २० सामना खेळवला गेला. न्यूझीलंडने टॉस जिंकत सुरुवातीला बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. चांगल्या सुरुवातीनंतरही निर्धारित २० ओव्हरमध्ये त्यांना ५ विकेटच्या बदल्यात केवळ १३२ रन्सही करता आल्या. एकही विकेट न देता ४८ रन्स करत त्यांनी सुरुवात केली. पण टीम इंडीयाच्या बॉलर्सनी चांगले पुनरागमन करत यजमान न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. न्यूझीलंडतर्फे मार्टीन गप्टील आणि टिम सीफर्ट यांनी सर्वाधिक ३३-३३ रन्स केले. भारतातर्फे रविंद्र जडेजाने सर्वाधिक दोन विकेट घेतले. 

१७.१ ओव्हरमध्येच भारताने १३५ रन्स बनवून सामना खिशात टाकला. न्यूझीलंडच्या भुमीत यजमानांनाच सलग दोनवेळा हरविण्याची टीम इंडीयाची ही पहिली वेळ आहे. भारताने ऑकलॅंडच्या या मैदानावर आधी दोन मॅच देखील जिंकल्या आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x