सुरेश रैनाने मागितली माफी, 'त्या' रात्रीची पूर्ण कहाणी समोर

 सुरेश रैनाच्या टीमकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय. 

Updated: Dec 23, 2020, 06:22 PM IST
सुरेश रैनाने मागितली माफी, 'त्या' रात्रीची पूर्ण कहाणी समोर title=

मुंबई : मुंबईतील नाईट क्लबमध्ये पोलिसांनी (Mumbai Police) छापा मारल्यानंतर माजी क्रिकेटपट्टू सुरेश रैनाला (Suresh Raina) ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आलं. कोरोना संदर्भातील नियम न पाळल्याने केलेल्या कारवाईनंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं. 'नकळत' झालेल्या दुर्देवी घटनेवर सुरेश रैनाने खंत व्यक्त केलीय. त्याच्यासोबत इतर ३४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यानंतर सुरेश रैनाच्या टीमकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय. 

सुरेश रैनाला क्लब खुला असण्याच्या आणि इतर नियमांबद्दल माहिती नव्हती. दिल्लीला रवाना होण्याआधी सुरेश रैनाच्या मित्राने त्याला रात्रीच्या भोजनासाठी आमंत्रित केले. पण जेव्हा समजले तेव्हा रैनाने नियमांचे पालन केले आणि झालेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. 

महिलांना नोटीस पाठवून सोडण्यात आलं तर पुरुषांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर जामिन देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं. ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ क्लब सुरु राहील्याने नियमांचे उल्लंघन करण्यात आले. यामुळे क्बबवर छापा टाकण्यात आला. 

सुरेश रैनाने टीम इंडीया (Team India) साठी 18 टेस्ट, २२६ एकदिवसीय आणि ७८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेयत. त्याने यावर्षी ऑगस्टमध्ये निवृत्तीची घोषणा केली. 

गायक गुरु रंधावा (Guru Randhawa), सुजैन खान (Sussanne Khan)आणि रॅपर बादशाह (Badshah ) यावेळी उपस्थित होते. हे सर्व मागच्या दाराने पळाले. पोलिसांनी ३४ जणांना ताब्यात घेतलंय. यावेळी सुरेश रैना देखील उपस्थित होता अशी माहिती सुत्रांनी दिलीय.

एका पब पार्टीच्यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप आहे. त्याने पार्टीदरम्यान कोरोना नियमांचे पालन केले नसल्याचे पबमध्ये दिसला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात रैनासह इतर अनेक सेलिब्रिटींनीही कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसले. महत्त्वाचे म्हणजे या पंचतारांकित हॉटेल क्लबमधील पार्टी दरम्यान सुरेश रैना यांच्यासह अनेकांनी ना मास्क घातला होता ना सामाजिक अंतर पाळले जात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक नामांकित सेलिब्रिटी सहभागी झाल्या होत्या.

मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, या करिता प्रशासनाने मार्गदर्शक तत्वे आणि नियमावली जारी केली आहे. मात्र त्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी काल रात्री एका पंचतारांकित हॉटेलवर केलेल्या कारवाईत क्रिकेटर सुरेश रैनासह एकूण  ३४ जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.