कोविड-१९च्या नियमाचे उल्लंघन, क्रिकेटर सुरेश रैनावर गुन्हा दाखल

क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरेश रैनावर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कोविड-१९च्या (Covid-19) नियमाचे पालन न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. 

Updated: Dec 22, 2020, 01:05 PM IST
कोविड-१९च्या नियमाचे उल्लंघन, क्रिकेटर सुरेश रैनावर गुन्हा दाखल  title=

मुंबई : क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरेश रैनावर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कोविड-१९च्या (Covid-19) नियमाचे पालन न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे. कोरोनाचे नियमाचे उल्लंघन करण्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत रैना समवेत ३४ जणांवर काल रात्री उशिरा कारवाई करण्यात आली.

सुरेश रैनाने (Suresh Raina) यावर्षी एमएस धोनीबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे. वैयक्तिक कारणास्तव तो यंदा यूएईमध्ये आयोजित आयपीएल २०२०मध्ये सहभागी होऊ शकलेला नाही. आता तो आणखी एका अडचणीत सापडला आहे. मुंबई पोलिसांनी सुरेश रैनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

एका पब पार्टीच्यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप आहे. त्याने पार्टीदरम्यान कोरोना नियमांचे पालन केले नसल्याचे पबमध्ये दिसला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात रैनासह इतर अनेक सेलिब्रिटींनीही कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसले. महत्त्वाचे म्हणजे या पंचतारांकित हॉटेल क्लबमधील पार्टी दरम्यान सुरेश रैना यांच्यासह अनेकांनी ना मास्क घातला होता ना सामाजिक अंतर पाळले जात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक नामांकित सेलिब्रिटी सहभागी झाल्या होत्या.

मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, या करिता प्रशासनाने मार्गदर्शक तत्वे आणि नियमावली जारी केली आहे. मात्र त्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी काल रात्री एका पंचतारांकित हॉटेलवर केलेल्या कारवाईत क्रिकेटर सुरेश रैनासह एकूण  ३४ जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.