रिव्ह्यू फेल झाल्यावर कोहलीने स्मिथची अशी घेतली फिरकी

 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेदरम्यान कर्णधार स्टीव्ह स्मिथ सोबत झालेली नोकझोक विराट कोहली कदाचित विसरला नाही. स्टीव्ह स्मिथने एक रिव्ह्यू घेताना पॅव्हेलियनकडे पाहिले होते त्यानंतर कोहली आणि टीमसोबत त्याचा वाद झाला होता. रविवारी झालेल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथचा रिव्हू पुन्हा फेल ठरल्यानंतर कोहलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव लपले नाहीत.

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 19, 2017, 03:36 PM IST
रिव्ह्यू फेल झाल्यावर कोहलीने स्मिथची अशी घेतली फिरकी

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेदरम्यान कर्णधार स्टीव्ह स्मिथ सोबत झालेली नोकझोक विराट कोहली कदाचित विसरला नाही. स्टीव्ह स्मिथने एक रिव्ह्यू घेताना पॅव्हेलियनकडे पाहिले होते त्यानंतर कोहली आणि टीमसोबत त्याचा वाद झाला होता. रविवारी झालेल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथचा रिव्हू पुन्हा फेल ठरल्यानंतर कोहलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव लपले नाहीत.
मार्कस स्टॉनीच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारच्या आऊट असल्याचे अपील ऑस्ट्रेलियन संघाने केले. अंपायरने हे अपील फेटाळल्यानंतर टीमने रिव्ह्यू सिस्टिम (डीआरएस) चा उपयोग केला. पण यातून त्यांच्या पदरी निराशाच आली. 
रिप्लेमध्ये हे लक्षात आले की बॉल पहिल्यांदा फलंदाजी करते. टीव्ही अंपायरची अपील फेटाळून लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे रेफरल अयशस्वी ठरले. यानंतर विराट कोहलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव लपून राहिले नाहीत.  रोहित पांडेने अपलोड केलेल्या या व्हिडीओमध्ये विराट कोहली ऑस्ट्रेलियन खेळाडूंची मजा घेताना दिसत आहे.