CSK आणि MI मधील या खेळाडुंना 'प्लेईंग ११' मध्ये संधी

 धोनीच्या टीमचा खेळात सुधार करण्याचा प्रयत्न

Updated: Oct 23, 2020, 06:33 PM IST
CSK आणि MI मधील या खेळाडुंना 'प्लेईंग ११' मध्ये संधी  title=

शारजाह : आज आयपीएल २०२० मधील ४१ वा सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडीयन्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. आज दोन पॉईंट्स मिळवून रोहीत शर्माची टीम प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के करु शकते. दुसरीकडे धोनीची टीम खराब परफॉर्मन्समध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करेल. 

चेन्नई सुपरकिंग्ज

चेन्नई सुपरकिंग्जचा यंदाच्या आयपीएलमधील खेळ वाईट होत चाललाय. यावेळी मुंबई इंडीयन्सविरोधात खेळताना ते युवा खेळाडुंना संधी देऊ शकतील. राजस्थान रॉयलसोबत हरल्यानंतर हा सिझन आपल्यासाठी संपल्याचे धोनीने स्वीकारल्याचे दिसतंय. पण उरलेल्या चारही मॅच जिंकल्या तर १४ पॉईंट्स त्यांना मिळू शकतात. यामुळे त्यांना प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी आहे. 

टुर्नामेंटच्या सुरुवातीच्या मॅचमध्ये मुंबई इंडीयन्सला हरवल्यानंतर चेन्नईसाठी स्थिती खराब होत चालली. टीमला राजस्थान रॉयलकडून हार पत्करावी लागली. दुखापत झाल्याने ब्रावो देखील चेन्नईसोबत नाहीय. त्यामुळे इतर खेळाडूंना संधी मिळते का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

चेन्नई सुपरकिंग्सची संभाव्य 'प्लेईंग ११' : सॅम कुरेन, फॉफ डुप्लेसी, शेन वॉटसन, अंबाती रायडू, एन जगदीशन, एमएस धोनी, रवींद्र जगदीशन, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, पीयूष चावला, जोश हॅजलवुड

चेन्नई सुपरकिंग्सची पूर्ण टीम : महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), मुरली विजय, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, रविंद्र जडेजा, लुंगी एनगिडी, दीपक चाहर, पीयूष चावला, इमरान ताहिर, मिशेल सेंटनर, जोश हेजलवुड, शारदुल ठाकुर, सैम कुरेन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, रुतुराज गायकवाड़ आणि करण शर्मा.

मुंबई इंडीयन्स 

मुंबई इंडीयन्सने सलग ५ मॅच जिंकल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबने हा विजयी रथ रोखला होता.  ४ वेळा आयपीएल चॅम्पियन जबरदस्त फॉर्मात असून त्यांच्या बॉलिंग चेन्नईच्या बॅट्समन्ससाठी आव्हान बनू शकते. चेन्नई टीमचा आत्मविश्वासदेखील तितका नाहीय. 

मुंबई इंडीयन्समध्ये क्विंटन डिकॉक चांगल्या फॉर्मात आहे. तर रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी देखील चांगला परफॉर्मन्स दिलाय. 

हार्दीक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी देखील मोठं योगदान दिलंय. स्पिनर राहुल चहरने चांगली बॉलिंग केलीय. मुंबईची बॉलिंगची फळी मजबूत आहे. 

मुंबई इंडियंसची संभाव्य 'प्लेईंग ११' : रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, जेम्स पैटिनसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

मुंबई इंडियन्सची पूर्ण टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंड्या, इशान किशन, जेम्स पैटिनसन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, मिशेल मैकलेनगन, मोहसिन खान, नाथन कूल्टर-नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.