जेव्हा पाक तरुणीने विचारले 'कोण विराट कोहली ?'

या ट्विटला पाकमधील कोहलीच्या चाहत्यांनी रिट्विट करत आपल्या भाषेत उत्तर दिले. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 11, 2017, 03:00 PM IST
जेव्हा पाक तरुणीने विचारले 'कोण विराट कोहली ?'  title=

नवी दिल्ली :  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शिक्षक दिनाच्या (सप्टेंबर 5) निमित्ताने आपल्या खास स्टाईलमध्ये गुरुजनांचे आभार मानले.

दरम्यान  'विराट कोहली कोण आहे?' असे एका पाकिस्तानी तरुणीचे ट्विट आले.

या ट्विटला पाकमधील कोहलीच्या चाहत्यांनी रिट्विट करत आपल्या भाषेत उत्तर दिले.

 

ज्यांच्याकडून शिकायला मिळाले अशा सर्व खेळाडूंची विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये आठवण काढली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कपिल देव, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी आणि परदेशी खेळाडूंचा विराटने उल्लेख केला होता. 
त्यामध्ये पाकिस्तानी खेळाडू जावेद मियाँदाद, इम्रान खान अशा अनेक दिग्गजांचे त्याने आभार मानत त्यांची स्तुती केली. 

'जगभरातील सर्व शिक्षक खासकरून जागतिक क्रिकेटच्या शिक्षकांना...'असे विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले.