युवराजकडून 'मास्टर ब्लास्टर'ला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा !

सचिन तेंडुलकर याचा ४६वा वाढदिवस आहे. 

Updated: Apr 24, 2019, 02:36 PM IST
युवराजकडून 'मास्टर ब्लास्टर'ला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा ! title=

मुंबई: भारतात क्रिकेट अतिशय लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जातो. आज क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा ४६वा वाढदिवस आहे. तसेच संपूर्ण जगभरातून सचिनवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिनने २०१३ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर निवृत्ती घेतली होती. परंतु अजूनही सचिनला चाहत्यांची कमी नाही.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावणाऱ्या पहिल्या आणि एकमेव खेळाडूच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सचिनने केलेली ही कामगिरी न विसरता येणारी आहे. प्रत्येक नवा क्रिकेटपटू सचिन याला आदर्श मानतो. याच मास्टर ब्लास्टरला मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज युवराज सिंह याने व्हिडीओच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

युवराज सिंह याने सचिन तेंडुलकरसोबत अनेक सामने खेळले आहेत. तसेच सचिनचे कौतुक करताना युवराज सिंह म्हणाला की, 'सचिन हा सर्वोत्तम फलंदाज आहे. सचिनने जे रेकार्ड रचले आहेत, ते अप्रतिम आहेत. याच अप्रतिम खेळाच्या जोरावरच त्यांना मास्टर ब्लास्टर हे नाव देण्यात आले आहे. आम्ही तुमच्यावर असेच प्रेम करत राहू आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! असे ट्वीट केले आहे.'