सीबीएसई : बोर्डाच्या परीक्षेतील मार्कांमध्ये मोठा गोंधळ

सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या निकालामध्ये मोठा गोंधळ झाल्याचे समोर आलेय. १२वीच्या विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये मोठी गडबड झाल्याचे समोर आलेय.

Updated: Jun 18, 2017, 11:16 AM IST
सीबीएसई : बोर्डाच्या परीक्षेतील मार्कांमध्ये मोठा गोंधळ title=

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या निकालामध्ये मोठा गोंधळ झाल्याचे समोर आलेय. १२वीच्या विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये मोठी गडबड झाल्याचे समोर आलेय.

दिल्लीमधील एका विद्यार्थ्यीनीला सर्व विषयांत ९०हून अधिक मार्क्स मिळाले. मात्र गणितातील मार्क पाहून तिला धक्काच बसला. गणितात तिला ६८ मार्क होते. जेव्हा व्हेरिकफिकेशनसाठी अप्लाय करण्यात आले तेव्हा त्या विद्यार्थ्यीनीचे मार्क ९५ पर्यंत वाढले. 

दुसरीकडे एका विद्यार्थ्यीनीने इंग्लिश, बिझनेस स्टडीज, फाईन आर्ट्स या विषयांत उत्तम मार्क मिळवले. मात्र गणितातील ४२ मार्क पाहून त्या विद्यार्थ्यीनीला धक्काच बसला. व्हेरिफिकेशनदरम्यान तिला ९० मार्क असल्याचे समोर आले. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मुंबईतील मोहम्मद अफानला सर्व विषयांत ८० टक्क्याहून अधिक मार्क मिळाले. मात्र गणितात त्याला ५० मार्क मिळाले. व्हेरिफिकेशननंतर त्याला गणितात ९० मार्क मिळाले होते. मोठ्या संख्येने अशी प्रकरणे समोर आल्याने सीबीएसईच्या तपासणी प्रक्रियेवर सवाल केले जात आहेत.