COMEDK 2018: चे हॉल तिकीट आले, असे करा डाऊनलोड

 हॉल तिकीट डाऊनलोड करण्यापूर्वी युजरने पहिल्यांदा आपले नाव, रोल नंबर, एग्जाम सेंटर, तारिख, वेळ आणि ठिकाण आदी गोष्टी हॉल तिकीटावर तपासून घ्याव्यात. 

Updated: May 5, 2018, 01:18 PM IST
COMEDK 2018: चे हॉल तिकीट आले, असे करा डाऊनलोड title=

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी घेतल्या जाणाऱ्या अंडर ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट (COMEDK UGET 2018)साठीचे हॉल तिकीट वाटप सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ही हॉल तिकीटे अधिकृत वेबसाईट comedk.org वर उपलब्ध आहेत. त्यासाठी यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून ४ ते १२ या कालावधीत विद्यार्थी हे अर्ज डाऊनलोड करू शकतात.

दरम्यान, COMEDK UGET 2018 सर्व अर्जदारांकडून आपेक्षीत आहे की हॉल तिकीट डाऊनलोड करण्यापूर्वी युजरने पहिल्यांदा आपले नाव, रोल नंबर, एग्झाम सेंटर, तारिख, वेळ आणि ठिकाण आदी गोष्टी हॉल तिकीटावर तपासून घ्याव्यात. 

COMEDK UGET 2018 चे हॉल तिकीट असे करा डाऊनलोड

  • अधिकृत वेबसाईट comedk.org  वर क्लिक करा
  • आता 'COMEDK UGET admit card 2018' लिंक करा
  • त्यानंतर आपला यूजर आयडी आणि पासवर्ड टाका
  • आता आपण आपले COMEDK UGET 2018 चे हॉल तिकीट डाऊनलोल करू शकता.
  • भविष्यासाठी उपयोगी येईल यासाठी हॉल तिकीटचे एक प्रिंटाऊट काढू शकाता...