शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांसाठी चालू वर्षासाठी वेळापत्रक जाहीर

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (Government Technical College) चालू वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी (technical students) पुढील वेळापत्रक (schedule) जाहीर झाले आहे.  

Updated: Dec 10, 2020, 10:01 AM IST
शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांसाठी चालू वर्षासाठी वेळापत्रक जाहीर  title=

मुंबई : शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (Government Technical College) चालू वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी (technical students) पुढील वेळापत्रक (schedule) जाहीर झाले आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रमाने प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

पहिल्या कॅप फेरीसाठी उमेदवारांनी १२ ते १४ डिसेंबरदरम्यान विकल्प अर्ज भरावेत. निवडलेल्या विकल्पांनुसार पहिल्या फेरीमध्ये कुठले महाविद्यालय आणि शाखा मिळाली किंवा नाही हे त्यांच्या स्वत:च्या लॉगिनमध्ये  १६ डिसेंबरला समजेल. १७ ते १८ डिसेंबरला शुल्क भरावे लागणार आहे. जागा वाटप स्वीकारल्यास तंत्रनिकेतनमध्ये १७ ते १९ डिसेंबरदरम्यान स्वतः मूळ कागदपत्रांसह येऊन प्रवेश निश्चित करायचा आहे, असे कळविण्यात आले आहे.