MHT CET 2018 निकाल जाहीर

बारावीच्या निकालानंतर आता एमटी-सीईटी​चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

Updated: Jun 3, 2018, 11:45 AM IST
MHT CET 2018  निकाल जाहीर   title=

मुंंबई: बारावीच्या निकालानंतर आता एमटी-सीईटी​चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.  महाराष्ट्रात इंजिनियरिंग आणि फार्मसीच्या प्रवेशासाठी आवश्यक असणार्‍या एमटी-सीईटी या परीक्षेचा निकाल राज्य तंत्र शिक्षण संचलनाच्या वेबसाईटवर  जाहीर करण्यात आला आहे. 

घवघवीत यश 

Physics Chemistry Biology (PCB)या ग्रुपमध्ये अभिजीत कदमने 200 पैकी 188 गुण मिळवत प्रथम आला आहे. 
Physics, Chemistry and Maths (PCM) या ग्रुपमध्ये 200 पैकी 195  गुणांसह अभंग आदित्य सुभाष प्रथम आला आहे. मुलींमध्ये PCM ग्रुपमध्ये मोना गांधीला 189 तर PCB मध्ये जान्हवी मोकाशीने 182 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. 

यंदा महाराष्ट्रभरातून 4.19 लाख विद्यार्थ्यांनी एमटी-सीईटी परिक्षा दिली आहे. लवकरच इंजिनियरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. बिहारच्या आदर्श कुमारला 'गूगल'मध्ये 1 कोटीच्या पॅकेजची ऑफर

कसा पहाल MHT CET 2018 चा निकाल ? 

http://www.dtemaharashtra.gov.in/mhtcet2018. या संकेतस्थळाला भेट द्या.  

रिझल्ट लिंकवर क्लिक करा. 

तुमचा रोल नंबर समविष्ट करा. 

त्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकता. निकालाची प्रिंट घेऊन ठेवा.