एमएचटी-सीईटीचा निकाल ३ जूनला

अभियांत्रिकी व औषधनिर्माण सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल ३ जून २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाच्याhttp://www.dtemaharashtra.gov.in/mhtcet2017 या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

Updated: Jun 2, 2017, 08:12 PM IST
एमएचटी-सीईटीचा निकाल ३ जूनला title=

मुंबई : अभियांत्रिकी व औषधनिर्माण सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल ३ जून २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाच्याhttp://www.dtemaharashtra.gov.in/mhtcet2017 या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत, शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा एमएचटी-सीईटी २०१७ परीक्षा ११ मे २०१७मध्ये घेण्यात आली होती. 

या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण ३ लाख ८९ हजार ५२० पैकी ३ लाख ७६ हजार २८२ (९६.६०%) उमेदवारांनी परीक्षा दिली होती. 

वरील संकेतस्थळावरून उमेदवारांना आपले स्कोअर कार्ड डाउनलोड करता येईल, अशी माहिती आयुक्त व सक्षम प्राधिकारी, राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्ष, मुंबई यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.